Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

प्रायव्हेट जेटमध्ये मांडी घालून बसलेल्या प्रियांका चोप्राचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘खरी देसी गर्ल’

 

असे म्हटले जाते की, मूळचा किंवा खरा भारतीय हा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेला, कितीही आधुनिक झाला तरी त्याच्या काही भारतीय सवयी तो सोडू शकत नाही. विशिष्ट सवयींवरूनच ती व्यक्ती भारतीय असल्याचे सर्वानाच समजते. किंबहुना त्या सवयी आपली ओळखच बनल्या आहेत. अनेकदा आपल्याकडून नकळतच इतरांसमोरही त्या सवयीचे दिसतात. असेच काहीसे झाले आहे, देसी गर्ल असणाऱ्या प्रियांका चोप्रासोबत.

प्रियांका चोप्रा हे नाव फक्त बॉलिवूडपुरतेच मर्यादित न राहता हॉलीवूडमध्ये देखील गाजत आहे. प्रियंकाने तिच्या अभिनयाने आणि तिच्या सौंदर्यने हॉलीवूडवरसुद्धा भुरळ घातली. सध्या प्रियांका तिच्या वेगवेगळ्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या शूटिंगच्या निमित्ताने तिला सतत फिरावे लागत आहे. तिच्या या प्रवासादरम्यानचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती विमानात बसलेली दिसत असून, ती चक्क विमानात मांडी घालून बसल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.

प्रियांका तिच्या पुढच्या प्रोजेक्ट्च्या शूटिंगसाठी ती स्पेनला रवाना झाली. हा प्रवास तिने एका प्रायव्हेट जेटमधून केला. या प्रवासादरमायन ती तिच्या टीमसोबत दिसली. प्रियांकाचे या प्रवासातील काही फोटो आणि काही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा स्ट्रीप शर्ट घातला असून, त्यावर ग्रे रंगाचे जॅकेट आणि ब्राऊन रंगाची पॅन्ट घातली आहे. प्रियांकाच्या मांडी घातलेल्या फोटोवर तिच्या फॅन्सकडून तर कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. या प्रवासात ती तिच्या प्रिय असणाऱ्या ‘डायना’ पेटसह दिसली. शिवाय तिने शॅम्पेनचा आस्वाद देखील घेतला.

या फोटोवर कमेंट्स करताना अनेकांनी तिला ‘खरी देसी गर्ल’, काहींनी लिहिले, ‘इंडियावाले’ तर काही यूजर्सला तिचा हा बसण्याचा अंदाज खूप आवडला आहे. एकाने कमेंट करताना लिहिले, ‘ही बसण्याची सोपी पद्धत आहे. खूप छान प्रियांका, तू अजूनही आमची देसी गर्ल आहेस.’

नुकतीच प्रियांका ‘द ग्लोबल सिटीझन इव्हेंट’साठी पॅरिसमध्ये पोहचली होती. यावेळी तिने घातलेला ‘अर्थ थीमचा’ फ्रॉक सर्वांना खूपच भावला. तशा कमेंट्स देखील तिला आल्या.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आलियाने केला रोमँटिक फोटो शेअर; मनातील भावनाही केल्या व्यक्त

-श्रुती मराठेच्या डॅशिंग लूकमधील फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष; कुणाला आवडला ड्रेस, तर कुणाला तिचा लूक

-गौतमी देशपांडेच्या ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटोने अमृता खानविलकरलाही घातली भुरळ; कमेंट करत म्हणाली…

हे देखील वाचा