प्रत्येक जोडप्याने आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिलेले असतात. हे जगात कुणीही नाकारु शकत नाही. या सर्व अडथळ्यांवर मात करून ते त्यांचं प्रेम टिकवून ठेवतात आणि नातं मजबूत करतात. बॉलिवूडची अशी अनेक जोडपी आहेत ज्यांनी आपलं एक रिलेशनशिप गोल ठेवलं आहे आणि ते स्वतः इतरांकरिता उदाहरण बनतायत. शाहरुख खान-गौरी खान, सैफ- करीना यांच्यासह आणखी बरीच नावे आपल्याला या यादीत सापडतील. या कलाकारांनी त्यांच्या जोडीदारावरील प्रेम खुलेपणाने व्यक्त केले आहे आणि त्यांची वैशिष्ट्ये सांगितली आहेत, परंतु असं बऱ्याच वेळा घडलंय जेव्हा त्यांनी त्यांच्या जोडीदाशी संबंधित विचित्र गोष्टीही उघड केल्या आहेत, चला तर मग अशा कलाकार जोड्यांबद्दल जाणून घेऊयात.
शाहरुख खान-गौरी खान
एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान स्टेजवर गौरी खानने शाहरुख खानबद्दल सांगितले की,’आज मला त्याच्या एका रहस्याविषयी सांगायचं आहे. जेव्हा जेव्हा आम्हाला पार्टीला जायचं असतं तेव्हा मी सहसा २० मिनिटांत तयार होते पण शाहरुखला मात्र तयार होण्यासाठी दोन ते तीन तास लागतात.’ गौरी पुढे म्हणाली की, ‘हे उदाहरण स्टाईलशी काही संबंध नसल्याचा दावा करणाऱ्यांसाठी आहे.’
सैफ अली खान – करीना कपूर खान
करीना कपूर आणि सैफ अली खान बॉलीवूडच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. सैफच्या सवयीमुळे करीनाची खूप चिडचिड होते. एका शोमध्ये करीनाने सांगितले की ‘सैफला वाचनाची फार आवड आहे, म्हणून दररोज संध्याकाळी तो बहुतेक पुस्तके वाचत राहतो. आम्ही सहसा संध्याकाळी ७.३० ते ८ या दरम्यान रात्रीचं जेवण करतो. आम्ही जर कोणी सैफशी बोललो तर त्याची पहिली प्रतिक्रिया ‘नाही’ आहे. मग मी म्हणते तुला हवंय तरी काय सैफ? आपण प्रत्येक पाऊल प्रयत्न करतच ठेवायला हवंय का? त्याची प्रतिक्रिया ‘नाही’ असते. आणि मग अचानक तीन तासानंतर तो मला ‘होय’ असा मेसेज करतो. मला असं वाटतं की तो फक्त अशाप्रकारे सहजच ‘नाही’ म्हणत असतो.’
प्रियांका चोप्रा – निक जोन्स
प्रियंका चोप्राने निक जोन्सबद्दल तो बेडरूममध्ये उठून सकाळी प्रथम काय करतो याबद्दल खुलासा केला आहे. प्रियांका चोप्रा म्हणाली होती की तिचा नवरा तिच्याकडे नेहमीच खूप आकर्षित असतो आणि दररोज तो पहाटे उठून तिचा चेहरा न्याहाळत बसतो.’ प्रियांका म्हणाली होती, “हे थोडं विचित्र असू शकतं पण जेव्हा मी झोपेतून उठते तेव्हा निक दररोज सकाळी उठून माझा चेहरा न्याहाळत असतो.” एका मजेदार पद्धतीने प्रियंका पुढे म्हणाली, “जेव्हा निक मला असे दिसतो तेव्हा मी त्याला म्हणते की एक मिनिट थांब, मी जरा मेकअप करून घेते.”
अजय देवगण – काजोल
काजोलविषयी एक गोष्ट अजय देवगणला खूप अस्वस्थ करते की ती खूपच जास्त बोलते. मात्र, काजोल जेव्हा हे करत नाही तेव्हा त्याला चुकल्या-चुकल्या सारखं वाटतं असही अजय म्हणाला. अजय म्हणतो की, ‘बर्याच वेळा ती चित्रपटाच्या सेटवर खूपच जास्त बोलू लागते. मी तिच्याकडे तक्रार केली की ती गुपचूप बसते.’










