Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

Christmas 2023: प्रियांका चोप्राने सुरू केली ख्रिसमसची तयारी, ‘देसी गर्ल’ने फोटो शेअर करून दाखवली झलक

डिसेंबर महिना सुरू झाला की, सर्वांचे लक्ष ख्रिसमस अर्थात नाताळ सणाकडे लागते. ख्रिसमस अर्थात नाताळ सणासाठी अनेक शहरातील बाजारपेठ सजल्या आहे. येत्या शनिवारी (25 डिसेंबर) ख्रिसमस साजरा होत असून, ख्रिस्ती बांधवांच्या खरेदीला उधाण आल्याचे पहावयास मिळत आहे. शहरातील ख्रिसमस डेकॉरेशन्सच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी होत आहे. ख्रिसमस ट्री (Christmas Tree), मेणबत्त्या, दिवे, फटाके, खेळणी, कपडे, उपहार इत्यादी वस्तूंची मागणी वाढली आहे. ख्रिसमस बांधव आपल्या घराघरांना आणि चर्चना सजवण्यासाठी या वस्तूंची खरेदी करत आहेत. तसेच कलाकार देखील ख्रिसमसची जोरदार तयारी करत आहेत.

ख्रिसमस (Christmas 2023) हा ख्रिस्ती धर्माचा सर्वात महत्त्वाचा सण आहे. या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. बायबल या धार्मिक ग्रंथानुसार येशू हा देवाचा मुलगा आहे. ख्रिसमसच्या दिवशी ख्रिस्ती बांधव एकमेकांना शुभेच्छा देतात आणि केक भरवून आनंद साजरा करतात. यावर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने शहरातील चर्चमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील ख्रिसमसची तयारी करत आहेत.

ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अभिनेत्री तिच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या बातम्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या अभिनेत्री ख्रिसमस सेलिब्रेशनच्या तयारीत व्यस्त आहे आणि अशा परिस्थितीत प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम (Priyanka Chopra Instagram) स्टोरीजवर एक फोटो शेअर करून ख्रिसमसच्या तयारीची झलक चाहत्यांशी शेअर केली आहे.

प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक फोटो शेअर करून खुलासा केला आहे की, तिने आणि तिचा प्रिय पती निक जोनास यांनी ख्रिसमसची तयारी सुरू केली आहे. फोटोत, ‘क्वांटिको’ अभिनेत्रीने तिच्या घराच्या फायरप्लेसच्या कोपऱ्याचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये फायरप्लेसचा कोपरा दिवे, बाऊबल्स, होलीने सजवण्यात आला आहे. त्यासोबत लाल रंगाचे मोजेही टांगण्यात आले आहेत. याशिवाय फोटोमध्ये फ्लॉवर पॉटही ठेवलेला दिसत आहे. फोटो शेअर करताना प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “ग्रेटफुल” (Priyanka Chopra gives sneak peek into her Christmas preparations)

यावर्षी प्रियांका तिचा पाचवा ख्रिसमस तिचा नवरा निकसोबत आणि तिची मुलगी मालती मेरीसोबत साजरा करणार आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोवरून असे संकेत देण्यात आले आहेत की, यावर्षी प्रियांका ख्रिसमसच्या तिच्या कुटुंबासोबत ख्रिसमस सण साजरा करण्याच्या मूडमध्ये आहे. गेल्या वर्षी प्रियांकाने न्यू जर्सीमध्ये ख्रिसमस साजरा केला होता. (Priyanka Chopra took to Instagram to share pictures of her home, showing a glimpse of Christmas preparations)

आधिक वाचा-
Akshay Kumar Cricket Team: बॉलिवूडचा ‘खिलाडी कुमार’ झाला क्रिकेट संघाचा मालक, पोस्ट करत दिली माहिती
बिकिनी परिधान करून स्विमिंगपूल शेजारी बसली मराठमोळी स्मिता गोंदकर, शेअर केला ‘तसला’ फोटो

हे देखील वाचा