Monday, July 1, 2024

प्रियांका चोप्राला या अवतारात पाहून चाहते झाले हैराण, फोटो झाला सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूड सोबतच हॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपलं नाव कमावणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. ती प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असते. ती नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. नेहमीच तिचा पती निक जोनास सोबत अनेक फोटो शेअर करत असते.

प्रियांका चोप्रा मागील काही दिवसांपासून तिच्या चाहत्यांसाठी तिच्या ‘वर्क इन प्रोग्रेस सीरिज सिटाइड’च्या सेटवरील तिचे अनोखे फोटो शेअर करत आहे. प्रियांका सध्या लंडनमध्ये तिच्या या सीरिजचे शूटिंग करत आहे. यामध्येच तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रियांका तिचा हॉलिवूड चित्रपट ‘टेक्स्ट फॉर यू’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यासाठी लंडनला गेली होती.

Photo Courtesy: Screengrab – Instagram Story/priyankachopra

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती गायक निक जोनास हे दोघेही सध्या कॅलिफोर्नियामध्ये राहत आहेत. सोमवारी प्रियांकाने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने सोनेरी फेस पॅक लावला आहे. या फोटोमध्ये तिची हेअर स्टाईल देखील खूप मजेशीर आहे.

दक्षिण चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या अभिनयाचा डंका मिरवणारी अभिनेत्री मीरा चोप्रा ही प्रियांका चोप्राची चुलत बहीण आहे. तिने एक मुलाखतीत खुलासा केला होता की, प्रियांका चोप्रामुळे तिला तिच्या अभिनयाच्या करीअरमध्ये मदत मिळाली नाही. मीराने तिच्या अभिनयाची सुरुवात तमिळमधील ‘अंबे अरुयायर’ या चित्रपटातून केली आहे. त्यानंतर तिने सतीश कौशिक यांच्या ‘गँग ऑफ घोस्ट’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ती बॉलिवूड चित्रपटात दिसली नाही.

प्रियांका चोप्राच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘द हीरो: लव्ह स्टोरी ऑफ स्पाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. खरंतर प्रियांका ही एक इंजिनिअर आहे. पण अभिनयाची आवड असल्याने ती या क्षेत्रात आली. त्यानतंर तिने ‘अंदाज’, ‘मुझसे शादी करोंगी’, ‘एतराज’, ‘क्रिस’, ‘डॉन:, ‘दोस्ताना’, ‘तीस खून माफ’, ‘मेरी कॉम’, ‘बर्फी’ , ‘दिल धडकने दो’, यासारख्या अनेक चित्रपट तिने बॉलिवूडमध्ये केले आहे. प्रियांका ही 2000 सालची मिसवर्ल्ड ठरली आहे. तसेच तिने अनेक फिल्म फेअर अवॉर्ड जिंकले आहे. तिला भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ या पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते. बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर तिने हॉलिवूडमध्ये प्रवेश केला. ती सध्या हॉलिवूडमध्ये देखील एक आघाडीची अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वी तिचे ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक प्रदर्शित झाले आहे.

हे देखील वाचा