Wednesday, October 15, 2025
Home बॉलीवूड ‘मेहंदी लगा के रखना’ गाण्याचं इंग्लिश व्हर्जन ऐकून प्रियांका चोप्रा झाली लोटपोट! तुम्ही ऐकलं का?

‘मेहंदी लगा के रखना’ गाण्याचं इंग्लिश व्हर्जन ऐकून प्रियांका चोप्रा झाली लोटपोट! तुम्ही ऐकलं का?

बॉलिवूडमधील गाणी आज सर्वत्र प्रसिद्ध आहेत. गाण्यांचे बोल आणि संगीत हे आज संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. अनेकांनी बॉलिवूड संगीतावर अनेक गाणी बनवली आहे. पण हिंदी गाण्याचे इंग्लिश व्हर्जन तुम्ही कधी ऐकले आहे का?? कदाचित नसेलच. पण ब्रिटिश रॅपर, गायक आणि लेखक जे शॉनने बॉलिवूड गाण्यासोबत असा एक प्रयोग केला हो ऐकून तुम्ही हसून लोटपोट व्हाल. त्याला भारतीय गाणी खूप आवडतात. जे शॉन अनेकवेळा बॉलिवूड गाण्यांसोबत प्रयोग करताना दिसतो. काही असाच प्रयोग त्याने शाहरुख खान आणि काजोलचा लोकप्रिय चित्रपट‌ ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ मधील प्रसिद्ध गाणे ‘मेहंदी लगा के रखना’ सोबत केला आहे. हे ऐकून प्रियांका चोप्रा तिचे हसू थांबवू शकली नाही.

जे शॉनने इंस्टाग्रामवर ‘मेहंदी लगा के रखना’ या गाण्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून ओरिजनल ट्यूनसोबत शेअर केले आहे. ‘ये कुडिया नशे दी पुडिया, ये मुंडे गली के गुंडे’ याचे इंग्लिश ट्रान्सलेशन ‘दिज गर्ल्स आर पॅकेट ऑफ इनटॉक्सीकेशन’, तर ‘मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना लेने तुझे ओ गोरी आयेंगे तेरे सजना’ याचे ट्रान्सलेशन ‘अप्लाय हिना ऑन योर हॅण्ड, डेकोरेट योर डोली, टू टेक अवे ओ ब्युटीफुल, योर लव्ह विल कम’, असे केले आहे. (Priyanka Chopra’s reaction on English version of mehendi laga ke rakhana)

जे शॉनचे हे ट्रान्सलेशन पाहून ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राला खूप हसायला आलं आहे. तिने या व्हिडिओवर हसण्याची ईमोजी पोस्ट करून सांगितले आहे की, तिला किती मजा आली आहे. तर काही लोकांनी लिहिले आहे, “भावा बास कर आता.” तर काहींनी लिहिले आहे की, “अजून ऐकायचे आहे.” जे शॉनचे हे इंग्लिश व्हर्जन लोकांना खूप आवडले आहे.

जे शॉन आणि प्रियांका चोप्रा हे खूप चांगले मित्र आहेत. जे शॉनने वयाच्या १२ व्या वर्षी रॅप करायला सुरुवात केली होती. शिक्षणात त्याचे मन न रमल्याने त्याने मध्येच शिक्षण सोडून दिले आणि सगळे लक्ष संगीतावर दिले. शॉनने खूप मेहनत करून त्याचे नाव कमावले आहे. त्याने बॉलिवूडमधील काही चित्रपटात देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वयाच्या चौथ्या वर्षी गायनाला सुरूवात करणाऱ्या सोनूने अभिनयातही आजमावलाय हात; वाचा त्याचा सुरेल प्रवास

-‘मनमोहिनी आज पाहिली…’, म्हणत कोणाच्यातरी विचारात गुंग झालाय स्वप्नील जोशी

-‘अश्रू आणि घाम दोन्हींमध्ये मीठ असतं, पण…’ अमिताभ बच्चन यांची लक्षवेधी पोस्ट इंटरनेटवर व्हायरल

हे देखील वाचा