Friday, July 5, 2024

यामी गौतमसोबत एका घरात राहायला घाबरायला लागलाय पती आदित्य धर, स्वत: सांगितले कारण

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमच्या (Yami Gautam) सस्पेन्स थ्रिलर ड्रामा ‘अ थर्सडे’चा अलिकडेच टीझर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रसारित केला जाईल. टीझर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. नुकताच आता यामीच्या ‘अ थर्सडे’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेला हा रोमांचक चित्रपट असल्याचे ट्रेलरवरून स्पष्ट होते. याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अभिनेत्रीचा पती आदित्य धरची (Aditya Dhar) प्रतिक्रिया वेगळी आणि आश्चर्यकारक होती.

खरं तर, ‘अ थर्सडे’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सगळेच तिचे कौतुक करत आहेत. दरम्यान, आदित्य धरचे  एक ट्वीटही समोर आले आहे. त्याने पत्नी आणि अभिनेत्री यामी गौतमबद्दल लिहिले की, “तुझ्यासोबत घरात राहायला भीती वाटते.” त्याचवेळी यामीने उत्तरात लिहिले की, “घाबरण्यासारखे काही नाही, लवकरच घरी भेटू.” यासह, तिने हसणारे इमोजी शेअर केले आहेत. फक्त ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये यामी गौतमची भूमिका जबरदस्त सस्पेन्सने भरलेली आहे.

विशेष म्हणजे अभिनेत्रीने यापूर्वी अशी भूमिका केलेली नाही. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की, कोलाबा पोलिस स्टेशनला फोन करणारी शिक्षिका नयना जयस्वाल सांगते की, तिने १६ मुलांना कैदी बनवले आहे. एवढेच नाही, तर ट्रेलरमध्ये ती पीएमसमोर मुलांना मारण्याची धमकीही देते. अर्थात आदित्य स्वतः यामीला अशा पात्रात पहिल्यांदाच पाहणार आहे.

अशा स्थितीत त्याला पत्नीबद्दल भीती वाटणे साहजिकच आहे. यामी गौतम व्यतिरिक्त या चित्रपटात डिंपल कपाडिया (Dimple Kapadia), नेहा धुपिया (Neha Dhupia) आणि अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) देखील दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचवेळी, हा चित्रपट १७ फेब्रुवारीला डिझनी प्लस हॉटस्टारवर दार ठोठावणार आहे.

हेही वाचा-

हेही पाहा-

हे देखील वाचा