बॉलिवूडमधून काळीज तोडणारी बातमी समोर येत आहे. या बातमीने कलाकारांसोबतच चाहत्यांनाही धक्का बसला आहे. प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक पहलाज निहलानी यांच्या आईचे निधन झाले आहे. त्यांच्यावर रविवारी (दि. २१ ऑगस्ट) दुपारी ३.३० वाजता सांताक्रूझ येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.
पहलाज निहलानी (Pahlaj Nihalani) हे बॉलिवूडमधील दिग्गज चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहेत. त्यांनी ८० आणि ९०च्या दशकात अनेक सुपरहिट सिनेमांची निर्मिती केली आहे. त्यांच्या सिनेमांमध्ये ‘शोला और शबनम’, ‘आँखे’, ‘आग ही आग’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, त्यांनी १९ जानेवारी २०१५ पासून ११ ऑगस्ट २०१७पर्यंत सेंसॉर बोर्डाचे अध्यक्षपद भूषवले आहे.
मागील वर्षी होते आजारी
मागील वर्षी निर्माते पहलाज निहलानी हेदेखील खूपच आजारी होते. त्यांच्यावर मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. ते २८ दिवस रुग्णालयात दाखल होते. मात्र, त्यांनी ही बाब बाहेर येऊ दिली नव्हती. तसेच, ते कोणाचेही फोन उचलत नव्हते. त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त त्यांचे जवळचे मित्र शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनाच याबाबतची माहिती होती. त्यांना अन्नातून विषबाधा झाली होती, त्यामुळे त्यांना रक्ताच्या उलट्याही झाल्या होत्या. सुरुवातीला ते पाच-सहा दिवस आयसीयूमध्ये होते.
शेवटची या सिनेमाची केली निर्मिती
पहलाज निहलानी यांनी गोविंदा याच्या ‘रंगीला राजा’ या सिनेमाची निर्मिती केली होती. खरं तर, ‘रंगीला राजा’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. मात्र, विशेष म्हणजे, १९८६मध्ये पहलाज निहलानी यांच्या ‘इल्जान’ या सिनेमातूनच गोविलांदाने बॉलिवूड कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर गोविंदाने अनेक सुपरहिट सिनेमे दिले. गोविंदाच्या सुपरहिट सिनेमांमध्ये ‘शोला और शबनम’, ‘आँखे’, ‘राजा बाबू’, ‘कुली नंबर १’, ‘साजन चले ससुराल’, ‘हिरो नंबर १’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘दुसरा कुठला असता तर आतापर्यंत उद्रेक झाला असता’, ऋतिक रोशन प्रकरणाचा वाद पेटला
‘ओव्हर ऍक्टिंगच दुकान’, पाणीपुरी खातानाचा व्हिडिओ पाहून पूनम पांडे झाली ट्रोल
दोन वर्षांपासून या व्यक्तीची होती अनुष्का सेनेवर नजर; अभिनेत्री म्हणाली, ‘मला काहीच माहित नव्हते’