Monday, July 1, 2024

मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध निर्माते प्रदीप उप्पूर यांचे दुःखद निधन

मनोरंजनविश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. हिंदी सिनेसृष्टीतील अतिशय प्रतिभासंपन्न असे निर्माते प्रदीप उप्पूर यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांनी सिंगापूरमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. प्राप्त माहितीनुसार प्रदीप हे सिंगापूरमध्ये एका उपचारासाठी गेले होते. मात्र त्या दरम्यानच त्यांचा मृत्यू झाला आहे. प्रदीप यांनी हिंदी चित्रपटांसोबतच टेलिव्हिजन विश्वात देखील भरीव कामगिरी केली. प्रदीप यांनी हिंदी सिनेसृष्टीमधे अतिशय हिट अशा ‘अर्धसत्य’, ‘हिप हिप हुर्रे’, ‘होली’ आणि ‘चक्र’ आदी चित्रपटांची निर्मिती केली होती.

चित्रपटांसोबतच त्यांनी टेलिव्हिजन विश्वात देखील काम केले. सर्वात जास्त काळ चालणारी आणि सुपरहिट असणाऱ्या सीआयडी मालिकेची निर्मिती देखील प्रदीप यांनीच केली होती. यासोबतच त्यांनी अजून इतरही काही कार्यक्रमांची निर्मिती केली. त्यांचा शेवटचा ‘नेलपॉलिश’ हा सिनेमा होता, जो दोन वर्षांपूर्वी zee5 या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाला होता.

प्रदीप यांनी अनेक जाहिराती, डॉक्युमेंट्री, मालिका यांची देखील निर्मिती केली होती. १९९४ साली त्यांनी ‘फायरवर्क प्रोडक्शन’ नावाने त्यांचे प्रोडक्शन हाऊस देखील लाँच केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“मला सिगारेट ओढणाऱ्या मुली आवडतात …”, सीमा पाहवा यांचं माेठं वक्तव्य, एकदा वाचाच

मधुचंद्रानंतर पारंपरिक पद्धतीने लग्न करणार स्वरा, हळदीच्या रंगात रंगली अभिनेत्री

हे देखील वाचा