Friday, March 29, 2024

आनंदाची बातमी! तमिळ सुपरस्टार सूर्याच्या ‘या’ चित्रपटाला ‘ऑस्कर’चे नामांकन

तमिळ सुपरस्टार सूर्या शिवकुमारच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मागील वर्षी नोव्हेंबर, २०२० मध्ये त्याचा ‘सूराराय पोत्रू’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ झाला होता. हा चित्रपट जगातील ३६६ चित्रपटांपैकी एकमेव भारतीय चित्रपट आहे, जो ऑस्कर २०२१मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या नामांकनासाठी पात्र ठरला आहे.

या यादीवर आधारित अकादमीचे मतदान ५ मार्चपासून सुरू होईल आणि १० मार्च रोजी संपेल. याव्यतिरिक्त १५ मार्च रोजी अर्ज जाहीर केले जातील.

२डी एंटरटेनमेंटच्या निर्मात्यांपैकी एक राजशेखर पांडियन यांनी ट्विटरवर ही बातमी शेअर केली आहे.

सूराराय पोत्रू’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुधा कोंगारा आणि अभिनेता सूर्या हे यावर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि इतर अनेक श्रेणींमध्ये ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत सामील झाल्याची घोषणा मागील महिन्यात केली गेली होती.

हा ऍक्शन ड्रामा चित्रपट १२ नोव्हेंबर, २०२० रोजी अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीझ झाला होता. हा चित्रपट एअर डेक्कनचे संस्थापक कॅप्टन जीआर गोपीनाथ यांच्या जीवनावर लिहिलेल्या ‘सिंपली फ्लाय’ पुस्तकाची काल्पनिक आवृत्ती आहे.

या चित्रपटाची निर्मिती सूर्या आणि गुनीत मोंगा यांनी केली आहे. या चित्रपटात मोहन बाबू आणि अपर्णा बालामुरली यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

यापूर्वी एका मुलाखतीत बोलताना सूर्या म्हणाला होता की, “माझ्या पूर्वीच्या सर्व भूमिका या रील आहेत. परंतु हे व्यक्तिमत्त्व, त्या माणसाचे आहे ज्याने आपले आयुष्य जगले आहे. तसेच तो एक नम्र माणूस आहे. तो वास्तविक जीवनाचा नायक आहे, त्याचे मोठे बनण्याचे स्वप्न होते, आणि त्याने ते केले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा