Sunday, August 3, 2025
Home मराठी हैद्राबाद कस्टडी या आगामी चित्रपटाच्या नायिका पीएसआय पल्लवी जाधव अडकल्या लग्नबंधनात

हैद्राबाद कस्टडी या आगामी चित्रपटाच्या नायिका पीएसआय पल्लवी जाधव अडकल्या लग्नबंधनात

चित्रपटांमध्ये काम करायला मिळावे अशी अनेकांची इच्छा असते. अगदी सुरुवातीपासूनच अभिनय हा अनेकांनी नेहमीच छंद म्हणूनच पहिला आणि आपले काम, नोकरी सांभाळत फावला किंवा उरलेला वेळ याला दिला. मात्र आज कला बदलला असून अभिनय हे करिअर म्हणून पाहिले जाते ज्याला संपूर्ण दिवस देता येतो. पण असे असे असूनही अनेक लोकं आजही त्यांचे काम सांभाळत अभिनय करताना दिसतात. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे पीएसआय पल्लवी जाधव. पेशाने पोलीस दलात पीएसआय या मोठ्या पदावर काम करणाऱ्या पल्लवी यांना अभिनयाची खूपच हौस आहे. आपले काम सांभाळत त्या या ग्लॅमर क्षेत्रात देखील कमालीच्या सक्रिय आहे.

पल्लवी जाधव या लवकरच भाऊसाहेब कऱ्हाडे यांच्या ‘हैद्राबाद कस्टडी’ या सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. तत्पूर्वी पल्लवी यांनी नुकतीच लगीनगाठ बांधली असून, त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. १५ मे रोजी पल्लवी आणि कुलदीप यांचा विवाह संपन्न झाला. मूळच्या औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल गावाच्या असणाऱ्या पल्लवी यांना लहानपानापासूनच अभिनयाची खूपच आवड होती. अभ्यासात हुशार असणाऱ्या पल्लवी यांनी घरच्या आर्थिक परिस्थिमुळे ग्लॅमर जगात न जात एमपीसी परीक्षेची तयारी सुरु केले. त्यांनी त्यांचे शिक्षण ‘कमवा आणि शिका’ या योजनेअंतर्गत काम करून पूर्ण केलं. अनेकदा त्या दुसऱ्यांच्या शेतात मजूरी करायला जायच्या. त्या त्यात पास देखील झाल्या.

पल्लवी या महिला सुरक्षेसाठी काम करणाऱ्या दामिनी या दलाचे नेतृत्व करतात. जयपूरमध्ये झालेल्या ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत त्यांनी फर्स्ट रनरअप हा किताब जिंकत, मिस फोटोजेनिकचा पुरस्कारही त्यांनी पटकावला. सोशल मीडियावरवर तर त्यांना बक्कळ फॉलोवर्स असून, त्यांचे पीएसआय आणि गलमेर अशा दोन्ही रुपातले फोटो नेहमीच व्हायरल होताना दिसतात. पल्लवी यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे की, वर्दी हे त्यांचे पहिले प्रेम असून त्या कायमच पोलीस दलात सेवा देत राहतील. मॉडेलिंग किंवा अभिनय हा फक्त त्यांचा छंद आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

हे देखील वाचा