Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

टेलिव्हिजनवरील पार्वतीच्या बोल्ड लूकची सोशल मीडियावर चर्चा, पूजा बॅनर्जीची ‘ती’ पोस्ट होतेय व्हायरल

छोट्या पडद्यावर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या मोठ्या अभिनेत्रींना टक्कर देतात. आपल्या सौंदर्याच्या जोरावर या अभिनेत्रींनी करोडोंच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. अशाच बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बॅनर्जी (Puja Banerjee). ‘देवों के देव महादेव’ या धार्मिक टीव्ही कार्यक्रमाला  प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता, या शोमध्ये ‘पार्वतीची’ महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बॅनर्जी प्रेक्षकांना आजही आवडते. पूजा तिच्या बोल्ड लूकमुळे अनेकदा चर्चेत असते. सध्या तिच्या अशाच बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घातला आहे. पाहूया तिच्या या फोटोंची खास झलक. 

पूजा बॅनर्जी ही छोट्या पडद्यावरील बोल्ड आणि हॉट अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. देवों के देव महादेव या मालिकेत पूजाने पार्वतीची भूमिका साकारली होती. या भूमिकेने पूजाला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. पूजा अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय आहे. तिचे अनेक बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या पूजाच्या अशाच हॉट फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये पूजा बॅनर्जीचा अतिशय स्टनिंग आणि ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. जे पाहून सगळेच वेडे झाले आहेत. या व्हायरल फोटोवर तिचे चाहते जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Puja Banerjee (@banerjeepuja)

 

पूजा बॅनर्जी सोशल मीडिया प्रेमी आहे, त्यामुळे ती तिचे फोटो आणि रील शेअर करत असते.पूजा बॅनर्जी इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे फोटो आणि फोटो शेअर करत असते. देवों के देव महादेव मालिकेत मोहित रैनाने या शिवाची भूमिका साकारली होती आणि प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बॅनर्जी हिने या शोमध्ये पार्वतीची भूमिका साकारली होती. आपल्या बोल्ड लूकमुळे चर्चेत येण्याची पूजाची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही पूजाच्या बोल्ड आणि हॉटलूकने नेटकऱ्यांना घायाळ केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा