Wednesday, July 3, 2024

‘साडी खेचली, छातीवर बुक्की मारली, माझा विनयभंग केला’ केतकी चितळेने कोणावर केले ‘हे’ गंभीर आरोप

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने अटक झालेल्या केतकी चितळेची( Ketaki Chitale) नुकतीच सुटका करण्यात आली. या वादग्रस्त पोस्टमुळे केतकी चितळेला ४१ दिवस जेलमध्ये राहावे लागले होते. या प्रकरणामुळे केतकी  चितळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आली होती. परंतु आता जेलमधून बाहेर येताच केतकीने विनयभंगाचा आरोप केला आहे. काय म्हणाली ती नेमके चला जाणून घेऊ. 

अभिनेत्री केतकी चितळे ही मराठी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.आपल्या अभिनयापेक्षा केतकी तिच्या विवादित वक्तव्यांमुळेच जास्तीत जास्त चर्चेत राहिली आहे. अलिकडेच एका फेसबूक पोस्टमुळे केतकी चितळेवर चौफेर टिका झाली होती. इतकेच नव्हेतर केतकीला या प्रकरणामुळे तुरुंगातही जावे लागले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची ही पोस्ट होती. ज्यामध्ये केतकीने शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत टिका केली होती. यानंतर केतकीवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केले होते.

यामुळेच अभिनेत्री केतकी चितळेला अटक करण्यात आली होती. केतकीचा हा जेलमधील मुक्काम तब्बल ४१ दिवसांनी संपुष्टात आला, मात्र बाहेर आल्याआल्याच केतकीने पुन्हा एकदा धक्कादायक आरोप केले आहेत. ज्याची जोरदार चर्चा रंगली आहे. केतकीने कोर्टातून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच या सगळ्या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना केतकीने सांगितले की, एखादी पोस्ट कॉपी पेस्ट करुन टाकल्यानंतर इतका मोठा गुन्हा होतो की थेट ४० दिवस तुरुंगात राहावे लागते. ही सर्व कारवाई नियमबाह्य होती. मला आधी कसलीही नोटीस देण्यात आली नाही.थेट घरातून उचलले गेले.

या प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांवर धक्कादायक आरोप करताना राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांकडून मला मारहाण करण्यात आली. माझ्या कानाखाली मारण्यात आली, माझ्या ब्रेस्टवरही मारण्यात आले. मी साडी घातली होती,ती साडीही खेचण्यात आली, माझी साडी वरती सरकली होती, माझा विनयभंग करण्यात आला असे धक्कादायक आरोप तिने केले आहेत. सध्या केतकीच्या या आरोपांंमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा –

कॅनडाच्या रस्त्यावर मध्यरात्री ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता करतोय तरी काय? धक्कादायक व्हिडिओ समोर

शॉकिंग! अवघ्या तिशीत ‘या’ अभिनेत्याला झाली देवाज्ञा, कॅन्सरने घेतला बळी

दाक्षिणात्य कलाकारांनी करण जोहरचा केला घोर अपमान, ‘या’ मोठ्या ऑफरवर मारली लाथ

हे देखील वाचा