Monday, July 1, 2024

पुनीतचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी, कर्नाटक सरकारला घ्यावा लागला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

दाक्षिणात्य सुपरस्टार पुनित राजकुमार याचे शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) वयाच्या ४६ व्या वर्षी निधन झाले आहे. त्याचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्याने झाला आहे. त्याच्या छातीत दुखत असल्याने त्याला बंगळुरूमधील विक्रम‌ हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले होते. तिथेच उपचारादरम्यान त्याने शेवटचा श्वास घेतला. त्याच्या निधनानंतर केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नव्हे, तर बॉलिवूडमधून देखील त्याला श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. सोशल मीडियावर त्याचे चाहते, तसेच अनेक कलाकार दुःख व्यक्त करत आहेत. अशातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करून दुःख व्यक्त केले आहे.

पुनीतचे निधन झाल्यानंतर चाहते त्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी वाट बघत आहेत. चाहते आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांसाठी त्याचे पार्थिव बंगळुरूमधील कांतिरवा स्टेडियममध्ये ठेवले आहे. अशातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुनीतच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे आणि त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच गर्दी ताब्यात ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी कलम १४४ लागू केले आहे. (Puneeth rajkumar last rites with state honours fans paid last respects at kanteerava stadium )

 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले की, पुनीतचे अंतिम संस्कार संपूर्ण राजकीय सन्मानानुसार होणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, पुनीतच्या अंतिम संस्कारासाठी त्याच्या मुलीची वाट बघत आहेत. जी सध्या अमेरिकेमध्ये राहते. ती भारतात आल्यानंतर पुनीतचे अंतिम संस्कार होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर बंगळुरू पोलिसांनी सगळी दारूची दुकाने दोन रात्र बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

बॉलिवूडमधील अनेक कलाकार पुनीतची ही बातमी ऐकून स्थब्ध झाले आहेत. सोनू सूद, अनिल कपूर, अजय देवगण, विवेक ओबेरॉय, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख यांसारख्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केले आहे. तसेच त्याच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना केली आहे.

तसेच नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर पुनीतसोबत एक फोटो शेअर करून लिहिले आहे की, “नियतीने आपल्याकडून एक अत्यंत प्रतिभाशाली अभिनेता घेतला आहे. त्याचे हे वय या जगातून जाण्याचे नव्हते. येणारी पिढी या महान अभिनेत्याला त्याच्या कामासाठी ओळखेल. त्याचा परिवार आणि मित्रासाठी सांत्वन, ओम शांती.” पुनीतने अनेक चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्यांच्या अशा अनपेक्षित जाण्याने सगळ्यांनाच दुःखद धक्का बसला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कौतुकास्पद! केले गेले पुनीत राजकुमारचे नेत्रदान, वडिलांनी काही वर्षांपूर्वी आख्या कुटुंबासाठी घेतला होता ‘हा’ निर्णय

-कन्नड सुपरस्टार राजकुमार यांचा मुलगा होता पुनीत; वीरप्पनने केले होते त्याच्या वडिलांचे अपहरण

-चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या पुनीतने बालपणीही गाजवलीय सिनेसृष्टी; दोन ‘राष्ट्रीय पुरस्कार’ केले होते नावावर

हे देखील वाचा