विवादांनी भरलेल्या ‘बिग बॉस’ या रियॅलिटी शोच्या १४ व्या सिझन जशी सुरुवात झाली, तशी यांतील स्पर्धकांबद्दल नव- नवे खुलासे होत आहेत. आता ‘बिग बॉस’च्या १४ व्या सिझनचा भाग बनलेल्या एका महिला स्पर्धकाचे वास्तव समोर आले आहे. ती स्पर्धक इतर कोणी नसून पंजाबी गायिका सारा गुरपाल आहे. शोच्या प्रीमियरदरम्यान साराला विचारले होते की, ती विवाहित आहे का? त्यावर प्रत्युत्तर देत तिने होस्ट आणि बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला सांगितले होते की, ती अद्याप अविवाहित आहे.
खरं तर, ती विवाहित आहे. साराचे हे वक्तव्य ऐकताच तिचा पती पंजाबी गायक तुषार कुमारने आपल्या लग्नाचे प्रमाणपत्र दाखवत खुलासा केला आहे. तुषारचे असे म्हणणे आहे की, सारासोबत त्याचे लग्न २०१४ साली झाले होते.
तुषारने म्हटले आहे की, सारासोबत त्याचे लग्न पंजाबच्या जालंधर येथे १६ ऑगस्ट २०१४ साली झाले होते. तो पुढे म्हणाला की, तसं त्याला समोर येण्याची काहीच गरज नव्हती. परंतु साराच्या या वक्तव्याने त्याला खुलासा करण्यासाठी प्रवृत्त केले. खरंतर तुषारने सांगितले आहे की, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सऍपवर सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणांवरून त्याला मेसेज येत होते की, जेव्हा साराचे लग्न त्याच्यासोबत झाले आहे, तर सारा सर्वजण पाहत असलेल्या टीव्ही शो बिग बॉसवर स्वत: ला अविवाहित का सांगत आहे? आपले लग्न सिद्ध करण्यासाठी तुषारने आपल्या लग्नाचे प्रमाणपत्रही जारी केले आहे.
साराच्या खोटे बोलण्यामुळे तुषारने म्हटले की, साराने त्याच्याशी लग्न प्रसिद्धी मिळवण्यासाठी केले होते. अमेरिकेचे नागरिकत्व मिळणे हा तुषारसोबत लग्न करण्यामागचा साराचा उद्देश्य होता. तुषारचे असे म्हणणे आहे की, साराला जेव्हा त्याच्याकडून लोकप्रियता मिळणे बंद झाले तेव्हा तिने त्याला सोडले. असे असले तरीही तुषारने जे लग्नाचे प्रमाणपत्र जारी केले आहे, त्यामध्ये त्या महिलेचे नाव रचना देवी आहे, सारा गुरपाल नाही. याबाबतीत अद्याप कोणतीही बाब स्पष्ट होऊ शकली नाही. यापूर्वी अशाप्रकारचा किस्सा अभिनेत्री पवित्र पुनियाच्या बाबतीतही घडला होता.