Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड Pushpa 2: 30 मिनिटाचा सीन अन्…चित्रपटाच्या या सीक्वेन्सवर ५० कोटी खर्च

Pushpa 2: 30 मिनिटाचा सीन अन्…चित्रपटाच्या या सीक्वेन्सवर ५० कोटी खर्च

2021मध्ये सर्वांना वेडं करणारा चित्रपट ‘पुष्पा’चा (Pushpa 2)सिक्वल लवकरंच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पुष्पा 2-द रूल’ (Pushpa 2: The Rule) असं या सिक्वलचं नाव असणार आहे. सध्या या चित्रपटाचं शुटिंग सुरु असून यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटासाठी निर्माते पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, निर्मात्याने चित्रपटाच्या सीक्वेन्सवर निर्मात्याने तब्बल ५० कोटी खर्च केले आहेत.

‘पुष्पा: द रुल’ या पिक्चरचा सिक्वेल १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे पुष्पा-२ हा चित्रपट सर्वात महागडा चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटातील एका सीनसाठी तब्बल ५० कोटी रुपये खर्चण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा सीन पार्ट २ मधील सर्वात महत्त्वाचा सीन असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘पुष्पा २’ मध्ये ‘गंगाम्मा तल्ली जथारा’ मधील एक सीन समाविष्ट करण्यात आलाय. हा सीन चित्रपटाच्या इंटरव्हलपूर्वी दाखवला जाईल. हा कथेचा एक महत्त्वाचा भाग असून हा सीन सुमारे ३० मिनिटे चालणार आहे. हा सीक्वेन्स शूट करण्यासाठी ३५ दिवसांहून अधिकचा वेळ लागलाय.

याच सीक्वेन्सवर ५० कोटींहून अधिक खर्च झाल्याचे सांगितलं जात आहे. तसेच या सिक्वेलमधील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक तिरुपती गंगाम्मा जटारा यांच्यापासून प्रेरित असल्याचं सांगितलं जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

चित्रपटाचे ५०० कोटींचे बजेट

‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या या महत्त्वाच्या सीक्वेन्सबाबत सांगितले जात आहे की, या सीक्वेन्समध्ये एक गाणे, फाईट सीन आणि एक इमोशनल सीन असू शकतो. या सीक्वेन्सनंतर चित्रपटाच्या कथेला एक महत्त्वाचे वळण मिळणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्याप याविषयी निर्माते किंवा कलाकारांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही. याशिवाय चित्रपटाच्या बजेटबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, 500 कोटी रुपयांचे आहे.

पहिल्या पार्टची कथा जिथे संपली, तिथून Pushpa 2: The Rule ची कथा सुरू होणार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. अल्लू अर्जुन या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदाना या चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अभिनेता फहद फासिलदेखील या चित्रपटाचा भाग असणार आहे.

हे देखील वाचा