रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) ही दाक्षिणात्य सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतः ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. रश्मिका आपल्या अभिनयाइतकीच सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. आपल्या दमदार अभिनयाने दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवल्यानंतर रश्मिका आता बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालण्यास सज्ज झाली आहे. म्हणजेच रश्मिकाला बॉलिवूड चित्रपटाची लॉटरी लागली आहे.
रश्मिका मंदान्ना ही एक सुप्रसिद्ध दक्षिणेकडील अभिनेत्री आहे, परंतु अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा – द राइज’ चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ या भूमिकेने रश्मिकाला रातोरात सुपरस्टार बनवले. पुष्पानंतर आता रश्मिकाची फॅन फॉलोइंगही वाढली आहे. तिला पुन्हा थिएटरमध्ये पाहण्यासाठी चाहते अस्वस्थ आहेत आणि आता रश्मिकाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. रश्मिका मंदान्नाला रणबीर कपूरसोबत संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अॅनिमल’साठी निवडण्यात आले आहे. खुद्द रश्मिकाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
याबद्दल बोलताना रश्मिका म्हणाली, ‘पुष्पा’मधील माझे काम पाहून ‘एनिमल’च्या निर्मात्यांनी मला या चित्रपटासाठी संपर्क केला. या चित्रपटाला हो म्हणण्यापूर्वी मी विचारही केला नव्हता, कारण मला विश्वास होता की प्रेक्षकांना माझा नवा लूक पाहायला मिळेल. रणबीर कपूरसोबत अनिल कूपर देखील ‘एनिमल’मध्ये दिसणार आहे. याचे एक व्हिडिओ पोस्टरही जारी करण्यात आले आहे. रणबीर कपूर आणि कबीर सिंग निर्माते संदीप रेड्डी वंगा ‘अॅनिमल’च्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर रणबीर कपूर चित्रपटात एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
दरम्यान अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन यांचा अल्लू अर्जुन ‘पुष्पा – द राइज’ हा २०२१ च्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. रश्मिकाने या चित्रपटात ग्रामीण मुलीची भूमिका साकारली होती, जी चाहत्यांना चांगलीच आवडली होती. तसेच अभिनेत्री रश्मिका मंदानाने पुष्पा व्यतिरिक्त ‘गुडबाय’, ‘गुडबाय’ ‘पुष्पा 2’, ‘मिशन मजनू’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यामधील रश्मिकाच्या भूमिकेचे जोरदार कौतुक झाले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा