Monday, June 9, 2025
Home साऊथ सिनेमा ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाण्याचा मराठीत देखील धुमाकूळ, मराठी व्हर्जन व्हायरल

‘पुष्पा’ चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाण्याचा मराठीत देखील धुमाकूळ, मराठी व्हर्जन व्हायरल

सध्या दाक्षिणात्य चित्रपट चाहत्यांच्या मनात घर करत आहेत. आत्ता सध्या आलेला ‘पुष्पा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करताना दिसतो आहे. ‘पुष्पा’मधील ‘श्रीवल्ली’ हे गाणे चाहत्यांना फार आवडले आहे. प्रत्येकजण त्या गाण्यावर प्रेम करत आहे. आता चक्क हे गाणे आपल्याला मराठीमध्ये पाहायला मिळणार आहे.

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा ‘पुष्पा’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने पुष्कळ कमाई केली आहे. या सिनेमातील सर्व गाणी चाहत्यांच्या पसंतीस पडली आहेत. त्यातील ‘श्रीवल्ली’ हे गाणे सगळ्यांना फार आवडलं आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिकाची जोडी पहिल्यांदाच एकमेकांबरोबर स्क्रिन शेअर करत आहे. याच सिनेमा समंथा प्रभूचे देखील एक आइटम सॉन्ग आहे.. या सिनेमातील गाण्यांची खूप मोठी  क्रेज केली आहे. अनेक रिल्स या गाण्यावर व्हायरल होताना दिसत आहेत. अनेक अभिनेते अभिनेत्री इंस्टाग्राम इनफ्लूइन्सर या गाण्यावर ती रिल्स बनवताना दिसत आहेत. खूप अल्पावधीत काळामध्ये ‘पुष्पा’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडून सिनेमाला सगळ्यांनी डोक्यावर घेतले आहे. (pushpa movies shrivalli song released in marathi version)

‘पुष्पा’ हा सिनेमा तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदीमध्ये डबिंग करून प्रदर्शित करण्यात आला आहे.  या चारी भाषांमधून ‘पुष्पा’ सिनेमाने बरीच कमाई केली आहे. त्याचवेळी प्रदर्शित झालेल्या अनेक सिनेमांच्या पातळीमध्ये परीक्षकांना ‘पुष्पा’ या सिनेमाने भुरळ घातली आहे. साउथ इंडियन सिनेमा हा नेहमीच वरचढ ठरला आहे. हिंदी सिनेसृष्टीत अनेक साउथ इंडियन सिनेमांचे रिमिक्स आपल्याला बघायला मिळतात आणि ते सिनेमे देखील बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करून जातात. साउथ इंडियन सिनेमांचा आशय.. विषय सादरीकरण या सगळ्याच बाजू उत्तम असल्यामुळे तो प्रेक्षकांच्या पसंतीस पडतोच आणि बॉक्स ऑफिसवर कमाई करतोच.

‘पुष्पा’ सिनेमातील ‘श्रीवल्ली’ या गाण्यावर विजय खंदारे यांनी साडे तीन मिनिटाचे एक मराठमोळे गावातील दोन युवकांना घेऊन त्यांची प्रेमकथा या गाण्यांमध्ये दाखवली आहे. हे ‘श्रीवल्ली’ या गाण्याचा रिमेक वर्जन आहे. या गाण्याला नऊ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि पाच हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत. जसे ‘श्रीवल्ली’ हे गाणे लोकांना फार आवडले तसेच हे मराठी वर्जन लोकांना फार आवडते आहे.

हेही वाचा :

 

हे देखील वाचा