Sunday, December 3, 2023

अभिनेता बाबिल खानला मिळाला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार, खास प्रसंगी घातला वडिलांचा सूट

प्रतिभावान अभिनेते इरफान खान यांचा मुलगा बाबिल खान देखील चांगलाच लोकप्रिय झाला आहे. इरफान खान यांच्या निधनानंतर त्याने अभिनयात पदार्पण केले. मनोवैज्ञानिक ड्रामा असलेली सिरीज ‘कला’मध्ये त्याने त्याच्या उत्कृष्ट अभिनयाची चुणूक सर्वांना दाखवली होती. नुकताच अभिनेता बाबिल खान एका पुरस्कार सोहळ्यामध्ये सामील झाला. यावेळी त्याने त्याचे दिवंगत वडील इरफान खान यांचा एक सूट घातला होता. या सोहळ्यात बाबिल खानला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार त्यांना अभिनेता शंतनू महेश्वरीसोबत विभागून देण्यात आला. शंतनूला ‘गंगुबाई काठियावाडी’मध्ये त्याचा अभिनयासाठी हा पुरस्कार दिला गेला. याच सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

View this post on Instagram

 

A post shared by Babil (@babil.i.k)

हा पुरस्कार मिळाल्यानंतर बाबिल खानने त्याचे मनोगत व्यक्त करत म्हटले की, त्याला खूप आनंद झाला असून, नेहमीच विभागून मिळालेल्या गोष्टीचा आनंद वैयक्तिक मिळालेल्या गोष्टीपेक्षा अधिक असतो. सोबतच त्याने हे देखील सांगितले की, शंतनूसोबत पुरस्कार मिळायचा त्याला अधिक आनंद आहे. त्याने सर्वच ‘कला’टीमला धन्यवाद म्हटले. अन्विता, क्लीन स्लेट, अनुष्का शर्मा, तृप्ति, स्वास्तिका आणि सिनेमाशी संबंधित सर्वच लोकांचे आभार मानत त्याच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तो पुढे म्हणाला, “हा पुरस्कार केवळ माझ्या कामासाठी नाही तर मला समर्थन आणि प्रेम देण्यासाठी देखील आहे.” अन्विता दत्त दिग्दर्शित ‘कला’मध्ये तृप्ति डिमरी, स्वस्तिका मुखर्जी, अमित सियाल. समीर कोचर मुख्य भूमिकेत आहे.

‘कला’ची कथा सिरीजमधील मुख्य कलाकाराच्या अवतीभोवती फिरते ज्यांच्यासोबत त्याची आई लहानपणापासून भेदभाव करत त्याला मानसिकदृष्टया त्रास देते. यामुळे ती खूप खचते आणि मानसिक आजारांमध्ये अडकते. ‘कला’ या सिरीजमध्ये कलाकारांचा अभिनय ही जमेची बाजू असून ही सिरीज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जान्हवी विमानतळावर ‘बाॅयफ्रेंड’साेबत झाली स्पाॅट, पॅपराझींची नजर पडताच लाजली अभिनेत्री

कुटुंबाने का केले नाहीत तारक मेहता यांचे अंत्यसंस्कार? घ्या कारण जाणून…

हे देखील वाचा