बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व सुरू होऊन एकच आठवडा झाला आहे. या दरम्यान स्पर्धकांचे अनेक खेळ पाहायला मिळाले असून, अशातच दुसऱ्या आठवड्याचे साप्ताहिक कार्य सुरू झाले आहे. तसेच या आठवड्याचे नॉमिनेशन कार्य देखील बिग बॉसने एका वेगळ्या पद्धतीने घेतले. या आठवड्यात जोडीने स्पर्धकांना नॉमिनेट करण्यात आले. तसेच ‘जोडी की बेडी’ ही या आठवड्याची घरातील थीम आहे. बिग बॉसने सर्वच सदस्यांचा जोड्या तयार करून दिल्या आहेत. ज्या जोड्या बनवल्या आहेत, त्या जोड्यांना आठवडाभर एकत्र राहायचे आहे. अशातच साप्ताहिक कार्य चालू झाले. या टास्कमध्ये बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच टीमविरुद्ध टीम लढणार आहे.
या टास्कचे नाव ‘हल्लाबोल’ असे आहे. यात गार्डन एरियामध्ये एक गाडी ठेवलेली आहे. यावर टीममधील दोन सदस्यांनी बसायचे आणि विरुद्ध टीममधील सदस्यांनी त्यांना उठवण्यासाठी प्रयत्न करायचे. या टास्कमध्ये पहिल्यांदा सुरेखा कुडची आणि सोनाली पाटील या बसतात. त्यांना उठवण्यासाठी सुरुवातीला मीरा त्यांना खूप टोमणे मारते. एवढंचं काय तर ती सोनालीच्या आवाजाची नक्कल करून दाखवते. हे सगळं बघून सोनाली खूप हसते. त्यावेळी टीममधील इतर सदस्य घरात जाऊन पाणी आणतात त्यांच्या अंगावर पाणी टाकतात.(Querrel between trupti Desai and vikas patil in halla bol task)
तसेच साबणाचे पाणी देखील त्याच्या तोंडावर टाकतात. त्यांच्या डोक्यावर अंडी फोडतात. अशातच या शोमधील बहुचर्चित स्पर्धक तृप्ती देसाई त्यांच्या तोंडावर साबणाचे पाणी टाकतात. तेव्हा हा सगळा प्रकार पाहून विकास खूप चिडतो आणि त्यांना खूप बोलत असतो. तो म्हणतो की, “नेहमी महिलांच्या बाजूने तुम्ही उभ्या असता ना आता सगळा महाराष्ट्र बघतोय तुम्ही काय करताय.” यावर तृप्ती म्हणतात की, “मग त्यांना काही होण्यापेक्षा गाडीवरून उठायला सांगा ना.”
आत उरलेल्या स्पर्धकांमध्ये हा डाव रंगणार आहे. त्यामुळे आता घरात नक्की काय राडे होणार आहेत आणि या खेळानंतर दरवर्षीप्रमाणे घरात दोन टीम पडतील का हे पाहण्यासाठी बिग बॉस प्रेमी खूप उत्सुक आहेत. तसेच या टास्कमध्ये जी कोणती टीम विजेती ठरेल त्यातील एका स्पर्धकाला कॅप्टनशीप टास्कसाठी पुढे येता येणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल
–बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम