अभिनेता आर माधवन (R Madhavan) सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’मुळे बराच चर्चेत आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चनंतर, सर्वजण त्याचे जोरदार कौतुक करत होते. परंतु शनिवारी (२५ जून) एका वक्तव्यामुळे नेटकऱ्यांनी त्याच्यावर जोरदार टीका केली. मात्र, यानंतर अभिनेत्याने आपली चूक मान्य केली आणि सांगितले की तो ट्रोल होण्यास पात्र आहे.
काय म्हणाला होता अभिनेता?
खरं तर, अभिनेता आर माधवनने चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान पत्रकार परिषदेत इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन) बद्दल आपले मत मांडले होते. यावेळी तो म्हणाला होता की, “इस्रोने मंगळावरच्या मोहिमेदरम्यान पीएसएलव्ही सी लॉन्च केले. त्यांनी २५ रॉकेट प्रक्षेपित करून, ते मंगळाच्या कक्षेत आणण्यासाठी हिंदू कॅलेंडरची मदत घेतली होती.” त्याचा व्हिडिओ समोर येताच, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि युजर्सने त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. (r madhavan response after being trolled for his statement)
ट्वीट करून मान्य केली चूक
सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाल्यानंतर आर माधवनने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने ट्वीट केले आणि लिहिले, “मी तमिळमध्ये ऑल्मनॅकला पंचांग म्हटले.. म्हणूनच मी ट्रोलिंगला पात्र आहे. माझी चूक झाली. मात्र हे नाकारता येणार नाही की, मिशन मंगलमध्ये फक्त दोन इंजिनच्या सहाय्याने आपण जे काही साध्य केले, ते स्वतःमध्येच एक विक्रम आहे.
????????I deserve this for calling the Almanac the “Panchang” in tamil. Very ignorant of me.????????????????????❤️Though this cannot take away for the fact that what was achieved with just 2 engines by us in the Mars Mission.A record by itself. @NambiNOfficial Vikas engine is a rockstar. ????❤️ https://t.co/CsLloHPOwN
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) June 26, 2022
रॉकेट्री: द नंबी इफेक्टबद्दल बोलायचे झाले, तर या चित्रपटात आर माधवन नंबी नारायण या इस्रो एरोस्पेस इंजिनिअरच्या भूमिकेत आहे आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आर माधवनचा दमदार अभिनय पाहायला मिळाला आहे. या अभिनेत्याने या चित्रपटात केवळ अभिनयच केला नाही, तर दिग्दर्शनही केले आहे. ‘रॉकेट्री द नंबी इफेक्ट’ १ जुलै २०२२ रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहे.