Wednesday, July 16, 2025
Home बॉलीवूड माधवनचा खुलासा – “प्रियंकासारखी ओळख बॉलिवूड हिरोंनाही हवीय” !

माधवनचा खुलासा – “प्रियंकासारखी ओळख बॉलिवूड हिरोंनाही हवीय” !

आर.माधवनचा (R. Madhavan) ‘आप जैसा कोई’ हा नवा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ते होते, तेव्हा त्यांनी प्रियंका चोप्राचं (Priyanka Chopra) भरपूर कौतुक केलं.

बॉलिवूडचा मैडी म्हणजेच आर.माधवन आपल्या जबरदस्त अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याची अ‍ॅक्टिंग लोकांना खूप आवडते. त्याने आपल्या करिअरमध्ये खूप चित्रपट केले आहेत. सध्या तो ‘आप जैसा कोई’ या आपल्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून यात त्याच्यासोबत फातिमा सना शेख मुख्य भूमिकेत दिसतेय.अलीकडेच एका इंटरव्ह्यूत माधवनने प्रियंका चोप्राबद्दल बोलताना तिच्या कामाचं भरभरून कौतुक केलं आहे.

आर. माधवनने सिद्धार्थ कननला दिलेल्या एका मुलाखतीत प्रियंका चोप्राबद्दल बोलताना म्हणाला की,बॉलिवूडमधले बरेच कलाकार तिच्यासारखे व्हायचं स्वप्न बघतात. तो म्हणाला,”प्रियंका यूँच हॉलीवूडमध्ये गेली नाही,तिने खूप मेहनत घेतली आहे. अलीकडेच तिचा एक चित्रपट आला होता ज्यात ती जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसली. बॉलिवूडचे हिरोजही हॉलीवूडमध्ये प्रियंकासारखी ओळख मिळवायला पाहतात,जसं ती त्या चित्रपटात धमाकेदार रोल करत होती”.

माधवन पुढे म्हणाला,”मी प्रियंकाचा खूप मोठा फॅन आहे. ती जशी आहे आणि जसं ती पुढे गेली आहे,ते खरंच खूप भारी आहे. मला तिचा अभिमान वाटतो”. आर. माधवनच्या ‘आप जैसा कोई’ या नव्या चित्रपटात एक मॉडर्न लव्ह स्टोरी दाखवली आहे. यात तो जमशेदपूरच्या एका साध्या माणसाची भूमिका करत आहे. त्याच्या अ‍ॅक्टिंगचं खूप कौतुक होतंय. माधवन आणि फातिमा यांची केमिस्ट्रीही लोकांना खूप आवडली आहे.

सध्या त्याच्याकडे खूप प्रोजेक्ट्स आहेत. तो सोशल मीडियावर आपले प्रोजेक्ट्स आणि अपडेट्स चाहत्यांना शेअर करत असतो. त्याने आपल्या करिअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोल केले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

‘खून भरी मांग’ च्या सेटवरचं रेखा आणि कबिरचं नातं उलगडलं!

हे देखील वाचा