Monday, July 1, 2024

आर माधवनच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, ‘या’ शास्त्रज्ञाच्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांसमोर

अभिनेता आर माधवनने दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये आणि बॉलिवूडमध्ये आपल्या प्रतिभेने मोठा नावलौकिक मिळवला. त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची वाहावी लुटलीच. माधवन एक अभिनेता म्हणून नक्कीच उत्तम आहे, मात्र तो एक माणूस म्हणून अधिक उत्तम आहे. त्याच्यातील माणुसकीचे विविध पद्धतीने आपल्याला दर्शन झाले आहे. मागच्याच वर्षी त्याचा ‘रॉकेटरी द नंबी इफेक्ट’ हा बायोपिक चित्रपट आला होता. यात त्याने प्रसिद्ध वैज्ञानिक नंबी नारायणन यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई तर केलीच सोबतच माधवनच्या अभिनयाचे देखील अमाप कौतुक झाले.

माधवनच्या या सिनेमानंतर आता तो कोणत्या सिनेमात दिसणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र आता ही उत्सुकता संपणार आहे. माधवनच्या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली असून, तो पुन्हा एकदा बायोपिकमध्ये काम करताना दिसणार आहे. माधवन त्याच्या आगामी सिनेमात महान वैज्ञानिक जीडी नायडू यांच्या भूमिकेत दिसणार असून, जीडी नायडू यांना ‘एडीशन ऑफ इंडिया’ आणि ‘वेल्थ मेकर ऑफ कोईम्बतूर’ म्हणतात. त्यांनी डी. बालसुंदरम नायडू यांच्या सहकार्याने पहिली भारतीय इलेक्ट्रिक मोटर विकसित केली होती. या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे.

देशातील पहिल्या इलेक्ट्रिक मोटरच्या निर्मितीशी जीडी नायडू यांचा वारसा जोडलेला आहे. ‘जीडी नायडू’ या चित्रपटाची निर्मिती मीडिया वन ग्लोबल एंटरटेनमेंट लिमिटेड करणार आहे. नुकतेच या चित्रपटाच्या टीमने चित्रपटाचे अधिकृत पोस्टर प्रदर्शित केले आहे.जीडी नायडू यांच्या बालपणापासून ते मृत्यूपर्यंतचा त्यांचा सविस्तर प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

दरम्यान माधवनने देखील त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर चित्रपटाचे पोस्टर रिट्विट केले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एक व्यक्ती एका गाडीकडे पाहत पाठमोरी उभी असलेली दिसत आहे. अर्थात या पोस्टरमध्ये जीडी नायडू हे त्यांच्या गॅरेजमध्ये उभे असल्याचे दिसत आहे. याच गॅरेजमध्ये त्यांनी इलेक्ट्रिक मोटरचा शोध लावला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY : जेव्हा चुलत बहिनीने जितेंद्र यांच्यावर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप, ऐकून सगळ्यांनाच बसला होता आश्चर्याचा झटका
आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात पोलिसांना मिळाली गायक समर सिंगची ट्रांजिट रिमांड, होणार मोठा खुलासा?

हे देखील वाचा