Wednesday, July 3, 2024

काय गं बाई, काय झालं तुला? राधिका आपटेचा फोटो पाहून चाहते झालेत हैराण

राधिका आपटेने (Radhika Apte) आपल्या कामाने चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. ती तिच्या प्रत्येक पात्रात अक्षरशः जीव ओतते. गेल्या काही वर्षांत तिने अनेक चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. राधिका सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे आणि तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी पोस्ट शेअर करत असते. अशातच आता राधिकाचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये तिला ओळखणेही कठीण होत आहे.

अभिनेत्रीला ओळखणे झाले कठीण
राधिका आपटेने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा लूक पूर्णपणे बदललेला दिसत आहे. यात तिला एका नजरेत तर कोणी ओळखूच शकत नाही. यात तुम्ही पाहू शकता की, राधिकाचे केस खूपच लहान आणि विखुरलेले आहेत. शिवाय तिचे कपडेही घाणेरडे दिसत आहेत. हा फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. खरं तर, राधिकाचा हा लूक तिच्या २०१६ मध्ये आलेल्या ‘पार्च्ड’ चित्रपटातील आहे. गुजरातच्या पार्श्वभूमीवर बनलेल्या या चित्रपटात तिने लज्जोची भूमिका साकारली होती. (radhika apte looks unrecognisable in this photo viral on internet)

इंटिमेट सीन्समुळे उडाली होती खळबळ
‘पार्च्ड’ चित्रपटात राधिकाने आदिल हुसैनसोबत खूप इंटिमेट सीन दिले होते, ज्यामुळे खळबळ उडाली होती. या चित्रपटातील बोल्ड सीन्सची बरीच चर्चा झाली होती. राधिका आणि आदिल व्यतिरिक्त सुरवीन चावला, लहर खान, तन्निष्ठ चॅटर्जी, सयानी गुप्ता या कलाकारांनीही या चित्रपटात काम केले होते.

राधिका आपटेचे चित्रपट
राधिका आपटेने २००५ साली ‘व्वा! लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘पार्च्ड’, ‘बदलापूर’, ‘पॅडमॅन’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘मांझी: द माउंटनमॅन’, ‘अंधाधुन’ आणि ‘बाझार’ हे तिचे प्रसिद्ध चित्रपट आहेत. राधिका शेवटची २०२० मध्ये ‘रात अकेली है’ चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम केले होते. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट चांगलाच पसंत केला गेला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा