Friday, December 8, 2023

चित्रपट मिळवण्यासाठी राधिकाला फोनवर माराव्या लागल्या अश्लील गप्पा, तरीही मिळाले नव्हते काम; स्वत: केला खुलासा

बॉलिवूडमध्ये आपण अनेक कलाकरांना कास्टिंग काऊचबद्दल बोलताना, सांगताना ऐकले असेल. अनेकदा कलाकरांना काम मिळवण्यासाठी निर्माता, दिग्दर्शकांकडून केले जाणाऱ्या कास्टिंग काउचला बळी पडावे लागते. हा अनुभव फक्त अभिनेत्रींनाच येतो असे नाही, अभिनेत्यांना देखील या अनुभवाला सामोरे जावे लागते. काही कलाकार त्यांच्या या अनुभवांबद्दल जगासमोर मनमोकळे बोलतात, तर काहींना या गोष्टी सांगायला संकोच वाटतो. आजपर्यंत आपण अनेकदा याबद्दल ऐकले असेल. ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत तर असे असंख्य अनुभव ऐकायला मिळाले होते. कास्टिंग काऊच म्हणजे फक्त संबंधच नाही, कास्टिंग काऊचमध्ये अनेक वेगळ्या गोष्टी देखील येतात. किंबहुना आता या इतर गोष्टींचा समावेश कास्टिंग काऊचमध्येच केला जातो. असाच एक अनुभव राधिका आपटेला देखील आला होता. तिने नुकताच तो अनुभव सांगितला आहे.

अभिनेत्री राधिका आपटे तिच्या अभिनयासाठी आणि तिच्यातील प्रतिभेसाठी ओळखली जाते. राधिका कमर्शियल चित्रपटांमध्ये कमी दिसते. तिचा बहुतेक करून कल हा पठडीबाहेरील चित्रपट करण्याकडे जास्त असतो. राधिकाने आजपर्यंत जेवढे सिनेमे केले तेवढे सर्व हिट तर झालेच, सोबतच तिच्या भूमिकेचे आणि अभिनयाचे देखील भरपूर कौतुक झाले. मात्र तिचा हा अभिनय प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. अनेक खाचखळग्यांमधून वाट काढून आज राधिकाने तिचे नाव तयार केले आहे. (radhika apte dev d audition)

राधिकाने नुकताच तिचा एका ऑडिशनच्या वेळेचा एक अनुभव नेहा धुपियाच्या ‘बीएफएफ विद वोग’ या शोमध्ये सांगितला. शोमध्ये तिने अभिनेता राजकुमार रावसोबत हजेरी लावत मनमोकळ्या गप्पा तर मारल्या, सोबतच तिचे अनेक चांगले वाईट अनुभव सुद्धा सांगितले. यावेळी तिने तिच्या एका सिनेमाच्या ऑडिशनचा एक विचित्र अनुभव सांगितला.

राधिकाने सांगितले की, ‘देव डी’ चित्रपटासाठी तिने दिलेले ऑडिशन तिच्या आयुष्यातील सर्वात विचित्र ऑडिशन होते. तिने पुढे सांगितले की, “मला या ऑडिशनमध्ये फोनवर अश्लील गप्पा मारायच्या होत्या. जर मी असे केले तर मी ऑडिशन पास केले असते. त्यावेळी मी पुण्यात राहायचे. मी त्याआधी असे कधीच केले नव्हते आणि हे असे मला सर्वांसमोर करायचे होते जे मी केलेसुद्धा. माझ्या अंदाजाने मी चांगले केले होते. ही गोष्ट वेगळी की माझी त्या भूमिकेसाठी निवड झाली नाही.” महत्त्वाचं म्हणजे राधिका ही एकटीच नाही, तर यापुर्वीही बऱ्याच अभिनेत्रींसोबत अशा गोष्टी घडल्या आहेत.

 

हेही नक्की वाचा-
श्रुती मराठेच्या साडीवर गणरायाच्या नावाची डिझाईन; पाहा फोटो
ओटीटी क्वीन असणाऱ्या राधिका आपटेने ‘या’ कारणामुळे लग्नात घातलेली फाटकी साडी, वाचाच

हे देखील वाचा