Monday, December 22, 2025
Home बॉलीवूड बॉयफ्रेंडसोबत आनंदात फिरत होती ही अभिनेत्री; कॅमेरे दिसताच गोंधळली, क्षणात बदलला मूड

बॉयफ्रेंडसोबत आनंदात फिरत होती ही अभिनेत्री; कॅमेरे दिसताच गोंधळली, क्षणात बदलला मूड

सेलिब्रिटींचे खासगी क्षण सार्वजनिक ठिकाणी टिपले जाणे हे काही नवीन नाही. पापाराझींच्या नजरेतून सुटणे स्टार्ससाठी अनेकदा अवघड ठरते. कॅफे असो वा विमानतळ, कॅमेरे नेहमीच त्यांचा पाठलाग करत असतात. अशाच एका घटनेत ‘अंग्रेजी मीडियम’ फेम अभिनेत्री राधिका मदन अलीकडेच एका गूढ तरुणासोबत बाहेर पडताना दिसली आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये राधिका शॉर्ट्स आणि क्रॉप टॉपमध्ये दिसत असून ती कथित प्रियकर विहान समतसोबत हातात हात घालून चालताना पाहायला मिळते. मात्र, पापाराझींनी त्यांना एकत्र पाहताच राधिका क्षणभर स्तब्ध झाली आणि तिने लगेच विहानचा हात सोडला. दोघांनीही मास्क घातले असतानाही पापाराझींनी त्यांना ओळखले आणि नावे घेऊ लागल्यावर राधिका अधिकच अस्वस्थ झाली. काही क्षणांतच दोघे वेगळे झाले आणि वेगवेगळ्या दिशेने निघून गेले.

या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका युजरने लिहिले, “जर तुम्ही प्रेम करता, तर मग घाबरायचं कशाला?” तर दुसऱ्याने म्हटले, “ते एकत्र खूप गोंडस दिसत होते, मग हात सोडायची गरज काय?” काहींनी तर या क्षणाची तुलना पालकांची भीती वाटल्यावर हात सोडणाऱ्या प्रेमीयुगुलाशी केली आहे.

राधिका मदन आणि विहान समत यांच्यातील डेटिंगच्या अफवा काही नवीन नाहीत. मे 2025 मध्ये दोघांचा मॉलमध्ये हातात हात घालून फिरतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर या चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर राधिका विहानच्या ‘CTRL’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये दिसली होती, तसेच दोघे फ्लाइटमध्येही एकत्र स्पॉट झाले होते. आता पुन्हा एकदा ते हात धरून दिसल्याने या अफवांना आणखी बळ मिळाले आहे.

विहान समत हा ओटीटी विश्वातील ओळखीचा चेहरा आहे. त्याने नेटफ्लिक्सवरील ‘मिसमॅच्ड’ (2020) या वेब सिरीजमधून करिअरची सुरुवात केली. यानंतर ‘एटरनली कन्फ्युज्ड अँड एजर फॉर लव्ह’, ‘द रॉयल्स’ अशा प्रोजेक्ट्समध्ये तो झळकला. ‘कॉल मी बे’ आणि ‘CTRL’मध्ये त्याने अनन्या पांडेसोबत स्क्रीन शेअर केली आहे.

दरम्यान, दोघांपैकी कुणीही या नात्याबाबत अधिकृत दुजोरा दिलेला नाही. राधिकाने याआधीही तिचे वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कामाच्या आघाडीवर बोलायचे झाले, तर राधिका मदन (Radhika Madan)लवकरच अनिल कपूरसोबत पोलिस  ड्रामा ‘सुभेदार’मध्ये दिसणार असून, दिनेश विजनच्या आगामी ‘रूमी की शराफत’ या चित्रपटातही ती झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

या दोन स्टार किड्सनी गाजवलं वर्ष; एकाचा अभिनय तर दुसऱ्याचं दिग्दर्शन ठरलं हिट

हे देखील वाचा