अखेर ज्या दिवसाची अनेक दिवसांपासून सगळे वाट बघत होते, तो दिवस आला आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा धुमधडाक्यात संपन्न झाला.स्वतः परिणितीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याच्या साखरपुडयाचे फोटो शेअर करत सर्वांना माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राघव आणि परिणीती यांच्या साखरपुड्याच्या तुफान चर्चा मीडियामध्ये आणि तिच्या फॅन्समध्ये गाजत होत्या. कुटुंब आणि मित्रपरिवारासह 150 लोकांच्या उपस्थितीत आज त्यांचा साखरपुडा जल्लोषात संपन्न झाला आहे. या सोहळ्याला प्रियांका चोप्रा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आदी अनेक दिग्गज हजर होते.
View this post on Instagram
या साखरपुड्यासाठी अभिनेत्री परिणिती चोप्राने आणि राघव चड्ढाने खास लूक केला होता. परिणिती आणि राघवने पांढऱ्या रंगाचा ड्रेस तर राघव यांनी पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला होता. या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना परिणितीने कॅप्शनमध्ये लिहिले, “मी प्रार्थना केली… अखेर मी हो म्हणाली”. त्याबरोबरच त्यांनी अंगठीचा इमोजीही शेअर केला आहे. हे फोटो अतिशय सुंदर असून यात परी आणि राघव अतिशय रोमॅंटिक मूडमध्ये दिसत आहे. यात त्यांनी त्यांच्या अंगठीचा फोटो देखील शेअर केला आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
झोपेतून उठला आणि थेट उर्मिलाच्या प्रेमातच पडला, वाचा उर्मिला आणि आदिनाथ यांची भन्नाट प्रेमकहाणी