Wednesday, July 3, 2024

राघव चढ्ढा बाॅलिवूडमध्ये करणार एन्ट्री? परिणीतीच्या हाेणाऱ्या नवऱ्याचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेता राघव चढ्ढा यांची काही दिवसांपुर्वीच एंगेजमेंट झाली. दोघांच्या एंगेजमेंटचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले, ज्यावर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अशात आता नुकताच राघव चड्ढाचा रॅम्प वॉकचा थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राघव एका डिझायनरसाठी रॅम्प वॉक करताना दिसत आहे.

खरं तर, राघव चढ्ढा (raghav chadha ) यांनी वर्षभरापूर्वी एका डिझायनरसाठी रॅम्प वॉक केला होता, ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ आणि फोटो पाहून चाहते राघवला ‘भाऊजी’ म्हणत चिडवताना दिसत आहेत.

राघव चढ्ढाच्या व्हिडिओवर चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट
राघवच्या रॅम्प वॉकच्या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘जिजाजींची बॉलिवूडमध्ये एन्ट्री’, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिले, ‘जिजाजी हिरो बनू शकतात’. अशात एका चाहत्याने कमेंट करत लिहिले, ‘तुम्ही हे करू शकता भाऊ’.

 

View this post on Instagram

 

A post shared by @parineetichopra

परिणीती चोप्रा अन् राघव चढ्ढा लवकरच अडकणार लग्न बंधनात
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांची नुकतीच दिल्लीतील कपूरथला येथे एंगेजमेंट झाली. या दरम्यान जाेडपे खूप आनंदी हाेते, ज्याचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यासोबतच राघव आणि परिणीतीच्या लग्नाची तयारीही सुरू झाली आहे. या जोडप्याला लवकरात लवकर लग्नाच्या जाेड्यात पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. मात्र, अद्याप या जोडप्याने लग्नाच्या तारखेची अधिकृत घोषणा केलेली नाही.(raghav chadha ramp walk throwback video gone viral after engagement with actress parineeti )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नाट्यगृहातील अव्यवस्थेमुळे ‘हा’ दिग्गज अभिनेता भडकला, प्रेक्षकांची माफी मागत घेतला मोठा निर्णय
विवाहित असतानाही रसिका अन् सुयाेगने केला ‘ताे’ किस सीन; अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या नवऱ्याला…’

हे देखील वाचा