बिग बॉस फेम राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि दिशा परमार (Disha Parmar) यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. लग्नाचा वाढदिवस संस्मरणीय बनवण्यासाठी दोघेही लंडनला पोहोचले आहेत. सुट्टीच्या काळात दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि सतत त्यांचे फोटो चाहत्यांसह शेअर करत असतात. चाहत्यांनाही या जोडप्याची रोमँटिक शैली आवडली आहे. अलीकडेच राहुलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून दिशासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे दोघेही चर्चेत आले आहेत.
अभिनेता राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या फोटोंची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये राहुल आणि दिशा यांच्यातील प्रेमाचे नाते खूपच सुंदर दिसत आहे. यातील एका फोटोमध्ये दोघेही लिपलॉक करताना दिसत आहेत. एका फोटोमध्ये दिशा राहुलला रोमँटिक स्टाईलमध्ये किस करताना दिसत आहे. राहुलने त्याच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हे फोटो टाकले आहेत. यासोबतच त्याने पत्नीसाठी एक सुंदर चिठ्ठीही लिहिली आहे.
या पोस्टमध्ये आपले हृदय शेअर करताना राहुल वैद्यने “पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिये. किती पटकन एक वर्ष निघून गेलं. तुझ्यासारखी जीवनसाथी मिळाल्याबद्दल मी खूप भाग्यवान समजतो. पुढचे सात जन्म मी फक्त तुझाच विचार कऱणार आहे. तुझ्या मनाच्या सौंदर्यामुळे मी रोज चमकतो. मी तुझ्यावर प्रेम करतो बायको,” अशा शब्दात आपले प्रेम व्यक्त केले आहे.
View this post on Instagram
ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या फोटोंवर लोक जोरदार कमेंट करत आहेत. एका व्यक्तीने ‘तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, देव तुम्हा दोघांनाही सदैव आशीर्वाद देवो’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचवेळी एका यूजरने ‘क्यूट कपलला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, अशी गोड प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय बहुतेक युजर्स हार्ट इमोजी बनवून दोघांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.