आज 9 डिसेंबरला अभिनेत्री बेगम पारा यांची पुण्यतिथी आहे. बेगम पारा यांचे खरे नाव जुबैदा उल हक होते. बेगम पाराने 2007 मध्ये अभिनेत्री सोनम कपूरच्या ‘सावरिया’ चित्रपटात शेवटचे काम केले होते. हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. बेगम पारा यांनी 9 डिसेंबर 2008 रोजी हे जग सोडले. बेगम पारा या ५० च्या दशकातील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्या काळात अभिनेत्री स्कर्ट घालायला आणि रोमँटिक सीन करायला लाजत होत्या, त्या काळात बेगम पाराने आपल्या मनमोहक स्टाईलने बोल्ड फोटोशूट केले.
अभिनेत्री बेगम पारा हिने ‘मुगल-ए-आझम’ चित्रपट करण्यास नकार दिला होता. या चित्रपटात तिला ‘बहार’ची भूमिका मिळाली. बेगम पाराला वाटले की, तिने ही भूमिका केली तर तिची प्रतिमा मलीन होईल. ही व्यक्तिरेखा ‘निगार सुलताना’ने या चित्रपटात साकारली होती.बेगम पारा यांनी 1958 मध्ये नासिर खानशी लग्न केले. नासिर खानसोबत लग्नानंतर बेगम पाराने अभिनय सोडला. नासिर खान हे अभिनेते दिलीप कुमार यांचे धाकटे भाऊ होते.
बेगम पाराने 1944 मध्ये ‘चांद’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाचे शूटिंग पुण्यातील प्रभात स्टुडिओमध्ये झाले. या चित्रपटात प्रेम अदीब एक अभिनेत्याच्या भूमिकेत होते आणि त्यात सितारा देवी यांनी व्हॅम्पची भूमिका केली होती. या चित्रपटाने त्या काळात चांगली कामगिरी केली होती.
1974 मध्ये पती नासिरच्या मृत्यूनंतर, बेगम पारा आपल्या कुटुंबासह दोन वर्षांसाठी पाकिस्तानला गेल्या. नंतर त्या भारतात परतल्या आणि संजय लीला भन्साळी यांच्या आग्रहास्तव ती पुन्हा अभिनयाकडे वळल्या आणि सावरिया चित्रपटाचाही एक भाग होत्या.त्या 2007 मध्ये आलेल्या ‘सावरिया’ चित्रपटाचा भाग होत्या. बेगम पाराने या चित्रपटात सोनम कपूरच्या आजीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील सोनम कपूरच्या पात्राचे नाव ‘सकीना’ आणि त्यांच्या आजीचे नाव ‘नबिला’ होते.
५० ते ६० चं दशक असं होतं जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री बोल्ड सीन्सपासून दूर राहायच्या. यादरम्यान, बेगम पारा या पहिल्या अभिनेत्री ठरल्या ज्यांनी हे बोल्ड फोटोशूट केले. या चित्रपटातील त्यांचा अभिनय त्यांच्या चाहत्यांना आवडला, पण बोल्ड फोटोशूट केल्यानंतर देशभरात त्यांची चर्चा होऊ लागली.
बेगम पारा 1947 मध्ये आलेल्या ‘नीलकमल’ चित्रपटात राज कपूरसोबत दिसल्या होत्या. त्यांनी नर्गिससोबत मेहंदी या चित्रपटातही काम केले आहे. याशिवाय भारत भूषण यांच्या सुहाग रातमधील त्यांच्या भूमिकेलाही चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले. ‘सोनी महिवाल’, ‘सोनी महिवाल’, ‘लैला-मजनू’ आणि ‘किस्मत का खेल’ यांसारख्या चित्रपटांमध्येही त्या दिसल्या होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा