Wednesday, July 3, 2024

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा सोबत दिसले शिल्पा आणि राज कुंद्रा, धर्मशाळातील मंदिरांना दिली भेट

शिल्पा शेट्टी साठी मागील काही महिने खूपच कृशल होते. राज कुंद्राला पोर्नोग्राफी व्हिडिओ तयार करणे आणि विकणे या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा चर्चेत आले. जवळपास दोन महिने राज कुंद्रा जेलमध्ये होता. त्यानंतर कोर्टाने त्याला जमीन मंजूर केला आणि तो बाहेर आला. मात्र राज कुंद्रा बाहेर येऊनही त्याचे दर्शन झालेच नाही. राज बाहेर आल्यानंतर शिल्पाने नवरात्री, दसरा, दिवाळी असे सण साजरे केले, पण यादरम्यान तो दिसला नाही.

मात्र नुकतेच राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीला सोबत पाहिले गेले. शिल्पा आणि राज हे दोघे धर्मशाळा मध्ये फिरत असून यावेळी त्यांनी चामुंडा देवी आणि ज्वालाजी मंदिर आणि त्यात असणाऱ्या पवित्र ज्योतींचे दर्शन घेतले. ८ नोव्हेंबर रोजी शिल्पा आणि राजने त्यांच्या मुलांसह या मंदिरांमध्ये दर्शन घेतले. यावेळी शिल्पाने पिवळ्या रंगाचा ड्रेस तर राज कुंदाने पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. यावेळी या मंदिरांचे मुख्य पुजारी असणाऱ्या ओम व्यास यांनी त्यांच्याकडून विधिवत पूजा करून घेतली. यासोबतच शिल्पा आणि राजने नंदिकेश्वर धाम या मंदिरात शंकराची आराधना देखील केली. शिवाय या मंदिरांचा संपूर्ण इतिहास देखील जाणून घेतला.

शिल्पाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या ट्रिपचे काही फोटो देखील शेअर केले आहेत, मात्र या फोटोंमधून राज गायब दिसला. यावेळी शिल्पाने अनेक फॅन्ससोबत फोटो देखील काढले. शिल्पाने सांगितले होते की, “मला या मंदिरात येऊन खूपच समाधान वाटले. मला इथे नेहमी यायला जमले तर नक्कीच येईल.” नंतर शिल्पाने ज्वालामुखी देवीचे देखील दर्शन घेतले.

शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर करताना रोज सिनेमातील गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत, “यह हसीं वादियां…यह खुला आसमां…ऐ मेरे साजना आ गए हम कहां” यासोबतच तिने नंदिकेश्वरधाम श्री चामुंडा मंदिर इथे जाताना शिल्पाने धर्मशाळाच्या रस्त्यांचे विविध व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. यात ती तिचा योगा देखील विसरली नाही. मैक्लोडगंज अतिशय सुंदर वातावरणात तिने योगा देखील केला. तिच्या या पोस्ट तुफान व्हायरल होत असून, त्यावर नेटकरी कमेंट्स आणि लाईक्स करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुखरूप परत ये, लग्न करायचंय’, बेअर ग्रिल्ससोबत ॲडव्हेंचरला निघालेल्या विकी कौशलच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट

-‘भाईजान’च्या तळपायाची आग मस्तकात! सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर भडकला सलमान, म्हणाला, ‘तू नाचणं…’

-ही दोस्ती तुटायची नाय! आशिष चंचलानीला दिलेले ‘ते’ वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी पोहोचला उल्हासनगरमध्ये

हे देखील वाचा