Saturday, July 6, 2024

राज कुंद्रा अन् शिल्पा शेट्टीचा सुरूये वाद? पतीशिवाय अभिनेत्री गेली कौटुंबिक ट्रिपला

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा तिच्या पतीच्या अटकेमुळे खूप चर्चेत होती. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लील चित्रपट प्रकरणात अटक करण्यात आली होती. अलीकडेच शिल्पा शेट्टी तिच्या कुटुंबासह अलिबागच्या ट्रिपला गेली होती. ती मांडवा ते जेटीला जाताना दिसली. तिच्यासोबत तिची आई सुनंदा शेट्टी आणि मुले वियान आणि समिशा होती. पण यावेळी तिचा पती राज कुंद्रा तिच्यासोबत दिसला नाही.

पतीशिवाय फिरायला निघाली शिल्पा?
तर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यात वाद झाला आहे का? याबाबत आताच काही बोलणे घाईचे आहे. राज आणि शिल्पाच्या घटस्फोटाच्या बातम्या याआधीही अनेकदा व्हायरल झाल्या आहेत. शिल्पा शेट्टी कुंद्राच्या पोशाखाबद्दल बोलायचे झाले, तर तिने निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आणि गुलाबी रंगाची फ्रॉक परिधान केलेल्या गोंडस समिशाला तिच्या मांडीवर घेतले आहे. शिल्पा नेहमीप्रमाणे पॅपराजींसोबत सभ्य दिसत होती. फोटोग्राफर्सना पाहून ती त्यांच्या दिशेने वळली. शिल्पाचा मुलगा वियान पांढऱ्या आणि बेज रंगाच्या कॅज्युअल टी-शर्टमध्ये दिसला. सुनंदा यांच्या लूकबद्दल बोलताना, त्यांनी जांभळ्या रंगाची सलवार कमीज परिधान केली आहे.

अश्लील चित्रपट प्रकरणात अडकलाय राज कुंद्रा
गेल्या महिन्यात आर्थर रोड कारागृहातून सुटका झाल्यापासून राज कुंद्राने अत्यंत कमी प्रोफाइल ठेवले आहे. तो प्रसिद्धीपासून दूर राहत आहे आणि बहुतेक वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवताना दिसतो. विशेष म्हणजे, अश्लील चित्रपट प्रकरणात तो जामिनावर बाहेर आहे. ऍडल्ट व्हिडिओ शूट केल्याबद्दल आणि प्लॅटफॉर्मद्वारे स्ट्रीमिंगमध्ये गुंतल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली होती.

शिल्पा शेट्टीने ‘या’ गोष्टींपासून अंतर ठेवले आहे का?
राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाने वर्कफ्रंटपासून स्वतःला दूर केले होते. तिने सर्व रियॅलिटी शो आणि इतर कार्यक्रमांना जाणे बंद केले होते. मात्र, राजला जामीन मिळाल्यापासून ती कामाच्या आघाडीवर सतत सक्रिय असते आणि पॅपराजींसमोरही ती सुंदर स्टाईलमध्ये दिसते. अनेकवेळा लोक सोशल मीडियावर या गोष्टीवर प्रश्न उपस्थित करताना दिसले आहेत की, अशा परिस्थितीतही शिल्पा इतकी खुश कशी असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोठी बातमी! राज कुंद्राकडून शर्लिन चोप्रावर ५० कोटी रुपयांचा खटला दाखल; म्हणाला, ‘शिल्पाला फोन करून…’

-शर्लिन चोप्राकडून राज अन् शिल्पा विरोधात तक्रार दाखल, आर्थिक फसवणूक सहित शारीरिक शोषणाचा केला खुलासा

-‘नवरा जेलमधून बाहेर येताच बदलली वागणूक’, म्हणत नेटकऱ्यांनी साधला शिल्पा शेट्टीवर निशाणा

हे देखील वाचा