Monday, July 1, 2024

कपाळावर कुंकू लावून तुरुंगातून बाहेर निघाला राज कुंद्रा, ६४ दिवसांनी मिळाला जामीन

राज कुंद्राला १९ जुलै रोजी अश्लील चित्रपट बनवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती आणि अखेर चौषष्ट दिवसांनी राज कुंद्रा तुरुंगातून बाहेर आला आहे. ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर राजला २० सप्टेंबर रोजी जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर आज २१ सप्टेंबरला राज कुंद्रा तुरुंगातून बाहेर आला.

राज कुंद्रा बाहेर येताच त्याला संपूर्ण मीडियाने गराडा घातला आणि अनेक प्रश्नांची सरबत्ती त्याच्यावर केली. मात्र राजने एकही प्रश्नाला उत्तर न देता तो थेट गाडीत जाऊन बसला. त्याला पोलिसांनी आणि बॉडीगार्ड्सने गाडीपर्यंत पोहचवले. जेलमधून बाहेर आल्यानंतर राजचे पहिले फोटो अतिशय बोलके वाटले.

राजच्या कपाळावर कुंकू लावलेले दिसले. या दरम्यान तो गाडी बसल्यानंतर मीडियामुळे खूपच त्रासलेला देखील दिसला. तो सतत मीडियाकडे पाहून वैतागत होता. राज ६४ दिवसांनी शिल्पाला त्याच्या मुलांना आई-वडिलांना भेटणार आहे. या ६४ दिवसांच्या मोठ्या काळात शिल्पा धीराने सर्व गोष्टींना तोंड देताना दिसली. या संपूर्ण प्रकारापासून तिने तिच्या दोन्ही मुलांना कायम लांबच ठेवले होते.

राजला जामीन मिळाल्यानंतर शिल्पाने सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली ज्यात तिने लिहिले होते की, “इंद्रधनुष्याचे अस्तित्व हे सांगायला पुरेसे आहे की, मोठ्या वादळानंतर सुंदर गोष्टी घडतात.” यावरून ती देखील राजला जामीन मिळाल्यामुळे खुश असल्याचे जाणवले. राज कुंद्रासोबतच त्याचा सहकारी आणि आयटी प्रमुख असणाऱ्या रायन थॉर्पला देखील जामीन मिळाला आहे.

तत्पूर्वी सत्र न्यायालयात राज कुंद्राची जामिन याचिका फेटाळल्यानंतर ऑगस्टमध्ये त्याने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. या जामिनासाठी अर्ज करताना राज कुंद्राने सांगितले की, या प्रकरणात त्याच्यासोबत अडकलेल्या एका आरोपीला जामिन मंजूर झाला. मग त्याच्या बाबतीतच असे का? न्यायालयाने त्याला देखील जामीन द्यावा.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाळेची फी भरण्यासाठी गुलशन ग्रोव्हर यांनी विकली डिटर्जेंट पावडर, मोठ्या संघर्षाने झाले बॉलिवूडचे ‘बॅडमॅन’

-कपूर घराण्याचे पाश तोडत केली बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तर ‘या’ कारणामुळे बेबोने राकेश रोशन यांना दिला होता डच्चू

-‘कन्यादाना’बद्दल बोलणे ‘बबली गर्ल’ला पडले भलतेच महागात, सोशल मीडियावर व्यक्त होतोय संताप

हे देखील वाचा