शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर चाहत्यांसाठी विविध प्रकारच्या पोस्ट टाकत असते. इतकंच नाही तर तिचा नवरा राज कुंद्रा देखील लोकांचं खूप मनोरंजन करत असतो. आता त्याने आपल्या इंस्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केला आहे. गावातली पंजाबी मुलगी असती तर शिल्पा शेट्टी कशी दिसली असती हे यातून सांगण्याचा त्याने प्रयत्न केलाय. असे आणखीन कोण कोणते व्हिडीओ बनवले आहेत राज कुंद्राने चला पाहुयात.
राज कुद्राने असे कॅप्शन दिले आहे की, जर मी पंजाबमधील खेड्यातील एखाद्या मुलीशी लग्न केले असते तर ती अशीच दिसली असती. यासह फेस फिल्टरसह एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये शिल्पा शेट्टी पंजाबी लूकमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये पार्श्वभूमीवर ‘लौंग-लाची’ गाणे वाजत आहे.
https://www.instagram.com/p/CJ9xbNghUAp/?igshid=1g5l36c6f0e89
यापूर्वी राज कुंद्राचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तो गाणं गात आहे आणि त्याची मुलगी समिशा त्याला कॉपी करताना दिसतेय. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये राजने लिहिलं आहे की, ‘नववर्षाभिनंदन! आपल्यासमोर सादर आहे माझी परी, माझं आयुष्य, माझी राजकुमारी समीशा शेट्टी कुंद्रा! टीप:- समीशाला बाबांचं गाणं आवडत नाही.
https://www.instagram.com/p/CJfe0Z8g0lO/?igshid=jesvix1pjpsx
राज कुंद्राने फेस ऍपद्वारे ‘गेम ऑफ थ्रोन्स’चं देशी व्हर्जनही बनवलं. त्यात तो आणि शिल्पा शेट्टी एका मजेदार लूकमध्ये दिसत आहेत. या व्हिडिओला त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,’ हिवाळा जवळ येत असताना मी आणि माझी बायको गेम ऑफ थ्रोन्सच्या देशी व्हर्जनमध्ये’
https://www.instagram.com/p/CJayia3AdxH/?igshid=fdlgvr51nkdg
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी २००९ मध्ये लग्न केलं होतं. तिथून आजपर्यंत त्यांच्यातील प्रेम हे दिवसागणिक वाढतच चाललं आहे. त्यांना विहान हा मुलगा असून मागच्याच वर्षी म्हणजे फेब्रुवारी २०२० मध्ये समिशा ही मुलगी देखील झाली आहे. समिशा सोबत राज कुंद्राची खूप सारी मस्ती सुरू असतो, ज्याचे व्हिडिओज आपल्याला त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर पाहायला मिळतात.










