Monday, July 1, 2024

‘मी ह्यालाच चिरंजीवित्व म्हणेन’. राज ठाकरे यांनी ट्विट करत वाहिली लता दीदींना आदरांजली

आज फेब्रुवारी भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांची पहिली पुण्यतिथी. आजच्या दिवशी २०२२ साली लता दीदींनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संगीत विश्वातील अतिशय मोठे आणि दिग्गज नाव म्हणून लता दीदींकडे पाहिले जाते. लता दीदींच्या जाण्यामुळे सर्वानाच मोठा धक्का बसला. दीदींनी संगीताच्या क्षेत्रात त्यांच्या आवाजाने अनेक सूर भरले. त्यांच्या निधनानंतर भारतीय संगीत विश्वाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. आज दीदींना जाऊन एक वर्ष पूर्ण झाले, मात्र त्यांची आठवण कोणी काढली नसेल असा एक दिवसही नाही. तमाम लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दीदींचा आवाज आजच्या दिवशी कायमचा बंद झाला. अनेक दिग्गज लोकांनी दीदींना स्मरत त्यांना आदरांजली वाहिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आज ट्विटर अकाउंटवर एक ट्विट करत दीदींना अभिवादन केले आहे.

राज ठकरे यांनी ट्विटरवर दीदींचा एक सुंदर फोटो पोस्ट करत लिहिले, “…लता दीदींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

“दीदींच्या निधनाला आज एक वर्ष झालं. मागच्या वर्षी नेमक्या ह्याच दिवशी, माझ्यासकट देशातील लाखो, करोडो लोकांना काहीतरी तुटल्याची भावना जाणवली. आणि ही भावना पुढे काही काळ मनात घर करून होती. पण काही काळाने दीदींच गाणं पुन्हा कानावर पडलं आणि एक जाणवलं की मूर्त स्वरूपातील दीदी गेल्या असल्या तरी अमूर्त स्वरूपातील दीदी कायम राहणार. माझ्यासारख्या अनेकांना दीदींचा आवाज कधीही आणि कुठेही ऐकला तरी तो क्षणात ओळखता येईल, पण ह्यापुढे कदाचित अनेक पिढ्या सुद्धा हा आवाज कोणाचा आहे हे चटकन जरी नाही ओळखता आलं तरी तो तितकाच आत ओढत राहील, शांत करत राहील.

चिरंजीवी होणं म्हणजे काय असं मला विचारलं तर मी ह्यालाच चिरंजीवित्व म्हणेन. दीदींच्या आठवणी आहेत राहतील पण त्याहून अधिक खोल त्या माझ्यासकट करोडो लोकांच्या जाणिवांमध्ये राहतील.

दीदींच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन !
राज ठाकरे”

दरम्यान लता दीदी आणि राज ठाकरे यांचे खूप जुने आणि घनिष्ठ संबंध होते. अनेकदा या दोघांना विविध कार्यक्रमांमध्ये सोबत पाहिले गेले होते. तत्पूर्वी लता मंगेशकर यांच्या गायकांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये झाली. त्यानंतर त्यांनी इतिहास रचत ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये गाणी गायली होती. शिवाय २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये त्यांनी गायन केले होते. ‘आनंदघन’ नावाने त्याने अनेक चित्रपटांना संगीत देखील दिले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शेखर सुमनने प्रियंका चौधरी अन् एमसी स्टॅनवर केला रॅप, स्पर्धक हसून हसून लाेटपाेट

सुकेशने तुरुंगातून पुन्हा लिहिले पत्र; म्हणाला, ‘मी चाहत खन्नासारखा गोल्ड डिगर …’

हे देखील वाचा