Monday, July 1, 2024

“बारामतीत काकांनी हात बाजूला केला तर…” राज ठाकरेंनी लगावला अवधूत गुप्तेच्या शोमध्ये अजित पवारांना टोला

सध्या मराठी टेलिव्हिजनविश्वात एकाच शोची जोरदार चर्चा सुरु आहे, आणि तो शो म्हणजे ‘खुपते तिथे गुप्ते’. संगीतकार, गायक असणाऱ्या अवधूत गुप्तेच्या या शोची सध्या चांगलीच हवा आहे. काही वर्षांपूर्वी या शोचा पहिला सिझन आला होता. तेव्हा तो अमाप गाजला. शोमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावून त्यांना बोलते करण्याचे काम अवधूत करतो. यावेळी मान्यवरांना अनेक तिखट प्रश्नांना देखील सामोरे जावे लागते.

लवकरच या शोचा दुसरा सिझन येत आहे. याचे प्रोमो खूपच व्हायरल होत आहे. या शोच्या पहिल्या भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिसणार आहे. याचे देखील काही प्रोमो प्रदर्शित केले गेले आहे. यातल्या एका प्रोमोमध्ये राज ठाकरे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

व्हायरल होणाऱ्या या शोच्या प्रोमोमध्ये दिसते की, “एकदा इलेक्शनमधून बाहेर पडल्यावर १४ आमदार निवडून आणले, की सगळे लोक त्यांच्यापासून दूर गेले.” असे अजित पवार राज ठाकरेंबद्दल बोलताना दिसतात. त्यावर राज ठाकरे अजित पवारांची नक्कल करत “ए गप रे…असे मी म्हणणार होतो,” असे म्हणतात. ”अजित पवार स्वत:च्या मुलाला निवडून आणू शकले नाहीत. बारामतीत काकांनी हात बाजूला केला, तर यांचे काय होईल,” हे ऐकून अवधूत देखील हसतो.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत असून, यावर भरभरून लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान या शोच्या पहिल्या भागाला मिळालेला प्रतिसाद पाहून आता दुसरा भाग येत आहेत. या शोला देखील प्रेक्षक चांगलाच प्रतिसाद देणार हे नक्की.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

जरा इकडे पाहा! चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री उतरली ‘या’ व्यवसायात, जाणून घेतलंच पाहिजे

अभिनयासोबतच क्रिकेट सामन्यांमुळे देखील समीर कोचरने मिळवली स्वतःची वेगळी ओळख

हे देखील वाचा