रितेश विलासराव देशमुख अभिनीत ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट आहे. तर या चित्रपटाचा फर्स्ट लूक टीझर प्रदर्शित केला आहे. तर या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे फर्स्ट लूक जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीने प्रदर्शित केला आहे. तसेच हा टीझर प्रदर्शित झाल्यापासुन चाहत्याची या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचा महान वारसाचे भव्य प्रमाणात सादरीकरण करणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश (ritesh)विलासराव देशमुख केले आहे. आणि तसेच या चित्रपटात अभिनयही केला आहे. हा चित्रपट स्वराज्याच्या स्थापनेवर आधारित एक भव्य, भावनिक आणि प्रेरणादायी कथा आहे. तसेच या कथेत भावना आणि शौर्य यांचा एक प्रभावी, सुंदर मिलाफ आहे. तर या चित्रपटात उत्तम स्टारकास्ट हि आहे. तर यात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जेनेलिया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
आता टीझरमधून कथेची एक झलक समोर आली आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य पाहायला मिळणार आहे. टीझर पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांची तुलना छाबरा यांच्याशी केली आहे. काहींच्या मते विकी कौशलसारखा प्रभाव ते पाडताना दिसत नाहित. तर काहींच्या मते त्यांचा दमदार आवाज उत्तम वातावरण निर्मिती करतो.
या चित्रपटाचे संगीत अजय-अतुल यांनी दिले आहे. तसेच ज्योती देशपांडे व जेनेलिया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होईल. हा चित्रपट भव्यता, भावना आणि अप्रतिम सादरीकरणासह भारतीय इतिहासाचा एक नवीन पैलू सादर करणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
पावसात फुललं प्रेम, अभिरा-अरमान विसरले वैर, रोमँटिक केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन










