Friday, July 5, 2024

राजीव सेनच्या कुटुंबाचे आणि चारु असोपाचे आहे अतिशय खास नाते, खुद्द राजीवनेच केला खुलासा

टीव्ही अभिनेत्री चारू असोपा आणि राजीव सेन हे कपल नेहमीच त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा अधिक वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहे. लग्न ठरल्यापासून ते घटस्फोटाच्या बातमीपर्यंत चारू आणि राजीव सतत लाइमलाईट्मधे होते. त्यांच्यातल्या छोट्यात छोट्या गोष्टीची माहिती देखील मीडियाला आणि त्यांच्या फॅन्सला होती. फॅन्समध्ये तर कपल गोल्स देणारे कपल म्हणूनही त्यांची ओळख होती. मात्र अशातच त्यांच्या घटस्फोटाची बातमी आली आणि सर्वच फॅन्स आणि मीडियाला धक्का बसला. एकमेकांपासून वेगळे झालेला चारू आणि राजीव नुकतेच त्यांच्या कुटुंबातील एका लग्नासाठी एकत्र आले होते. तेव्हा चारू आणि राजीच्या कुटुंबातील एक खास बॉन्ड सर्वांना पाहायला मिळाला. यावरच राजीवने एका मुलाखतीमध्ये त्याचे मत मांडले आहे.

नुकतेच चारुला राजीवच्या एका भावाच्या लग्नात स्पॉट करण्यात आले. या लग्नात चारू भरपूर एन्जॉय करताना दिसली. या लग्नात चारूने तिचा एकटीचा एक परफॉर्मन्स देखील सादर केला शिवाय राजीवसोबत देखील कपल डान्स केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकाऱ्यानी कमेंट्स करत सांगितले की, चारूची राजीवच्या कुटुंबासोटची बॉण्डिंग खूप खास आहे. आता यावर राजीवने देखील भाष्य केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajeev Sen (@rajeevsen9)

एका मुलाखतीमध्ये राजीव सेन याबद्दल बोलताना म्हणाला, “हो मी देखील ऐकले की माझे कुटुंब चारूला खूप पाठिंबा देतात आणि का नाही… चांगले आहे ना. मला आनंद आहे की, चारूचे माझ्या आईवडिलांशी असलेले नाते आणि माझ्या बहिणीसोबत असलेला तिचा ताळमेळ खूपच चांगला आहे. मला यामुळे का फरक पडेल. या गोष्टी माझ्या कुटुंबासोबतच्या माझ्या नात्याला प्रभावित करत नाही. आम्ही दोघं परिवार खूपच जवळ आहोत.”

राजीवने या मुलाखतीमध्ये सुश्मिता आणि चारू यांचे बॉण्डिंग कसे आहे, हे देखील सांगितले. राजीव म्हणाला, “सुश्मिता इंस्टाग्रामवर मला फॉलो करत नाही, मात्र चारूला करते. आधी मला खूप वाईट वाटायचे मात्र आता मला फरक पडत नाही. तिने कोणाला फॉलो करायचे कोणाला नाही हा तिचा प्रश्न आहे.” तत्पूर्वी राजीव आणि चारू यांचे लग्न तुफान गाजले. किंबहुना त्यांच्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टी सोशल मीडियावर यायरल झाल्या. मात्र आता राजीव आणि चारू ही फॅन्सची आवडती जोडी विभक्त झाली आहे. या दोघांना एक मुलगी असून, ती चारुकडे असते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘आपल्या मुलांना मोठे होताना पाहणे…’ रवीना टंडनने लिहिली मुलगी राशासाठी खास पोस्ट

चार दिन की चांदनी! गौतमी पाटीलवर मेघा घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘सगळ्या मर्यादा…’

हे देखील वाचा