Wednesday, July 3, 2024

‘मी हैराण आहे, मला नव्हतं माहित ती…’, ललित मोदींसोबतच्या रिलेशनशिपवर सुष्मिताच्या भावाचे धक्कादायक वक्तव्य

कलाविश्वातून खळबळ माजवणाऱ्या बातम्या येत आहेत. त्यापैकीच एक सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या रिलेशनशिपची बातमी आहे. आयपीएलची स्थापना करणारे आणि पहिले अध्यक्ष असलेले ललित मोदी यांनी गुरुवारी (दि. १४ जुलै) सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी घोषणा करत सांगितले की, ते आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन एकमेकांना डेट करत आहेत. या बातमीने सर्वचजण हैराण आहेत. विशेष म्हणजे, हे ऐकून सुष्मिताचा भाऊ राजीव सेन यालाही विश्वास बसत नाहीये.

काय म्हणाला राजीव सेन?
सुष्मिता सेन आणि ललिल मोदी यांच्या रिलेशनशिपवर (Sushmita Sen And Lalit Modi Relationship) राजीव सेन (Rajeev Sen) याने एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली. त्याने सांगितले की, तो या बातमीने किती हैराण झाला आहे. माध्यमांशी बोलताना राजीव म्हणाला की, “मला आनंद तर आहेच, पण त्यासोबतच मी हैराणही आहे. मी काही बोलण्यापूर्वी आधी आपल्या बहिणीशी बोलेल. मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. माझ्या बहिणीकडून याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आली नाहीये. त्यामुळे मी यावर आता बोलू शकत नाही.”

ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांचे रोमँटिक फोटो
इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल (IPL) या टी२० स्पर्धेचे संस्थापक ललित मोदी यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत सुष्मितासोबतच्या नात्याचा खुलासा केला. त्यांनी अनेक फोटो शेअर केले. यामधील काही फोटो त्यांच्या तारुण्यातीलही होते. रोमँटिक फोटो शेअर करत ललित मोदी (Lalit Modi) यांनी गर्लफ्रेंड सुष्मिता सेन (Sushmita Sen) हिला आपली पार्टनर म्हटले होते. तसेच, त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “प्रेमात आहे याचा अर्थ असा नाही की, लग्न झाले आहे. मात्र, देवाच्या कृपेने असेही एकदा नक्की होईल. मी आता घोषणा केली आहे की, आम्ही सोबत आहोत.”

सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्यातील वयाचे अंतर
विशेष म्हणजे, ललित मोदी यांच्या इंस्टाग्रामवरील प्रोफाईल फोटोमध्ये सुष्मिता सेनही दिसत आहे. त्यांनी लिहिले आहे की, “शेवटी मी माझ्या क्राईम पार्टनरसोबत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करत आहे. माझे प्रेम सुष्मिता सेन.” ललित आणि सुष्मिता यांच्यामध्ये तब्बल १० वर्षांचे अंतर आहे. सुष्मिताचे वय ४६ वर्षे आहे, तर ललित ५६ वर्षांचे आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lalit Modi (@lalitkmodi)

सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांचे ब्रेकअप
ललित मोदी यांना डेट करण्यापूर्वी सुष्मिता सेन मॉडेल रोहमन शॉल (Rohman Shawl) याला डेट करत होती. रोहमन आणि सुष्मिता यांनी तब्बल ३ वर्षे एकमेकांना डेट केले आणि ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही राहिले. मात्र, दोघांनीही डिसेंबर, २०२१ मध्ये आपल्या वेगळ्या वाटा निवडल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

फक्त सुष्मिता सेनच नव्हे, ‘या’ अभिनेत्रींनीही बड्या उद्योगपतींना ओढले होते प्रेमाच्या जाळ्यात

‘प्रत्येकवेळी नाही म्हणतो पण…’ ७९ वर्षीय अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाबद्दल बोलताना झाले भावूक

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ललित मोदींना करतेय डेट, लवकरच लग्न करणार असल्याची दिली माहिती

हे देखील वाचा