Monday, July 1, 2024

दोन दिवसांतच भोजपुरी गाण्याने रचलाय युट्यूबवर विक्रम, राकेश मिश्राच्या गाण्याला चाहत्यांच्या मिळतायत जोरदार हिट्स

भोजपुरी चित्रपट सृष्टीमध्ये आज अनेक आघाडीचे सुपरस्टार बनले आहेत. खास करून भोजपुरी गाण्यांनी भोजपुरी इंडस्ट्रीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहचवले आहे. बॉलिवूडप्रमाणेच भोजपुरी गाणी देखील आता रातोरात हिट होतात. यात सगळ्यात मोठा हातभार असतो, तो म्हणजे भोजपुरी कलाकारांचा. त्यांच्या अभिनयाने आणि गायनाने ते प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. याच कलाकारांमध्ये समावेश होतो तो म्हणजे भोजपुरी सुपरस्टार राकेश मिश्राचा.

राकेश मिश्राची लोकप्रियता या दिवसात गगनाला भिडलेली पाहायला मिळत आहे. एका नंतर एक अशी हिट गाणी देऊन त्याने त्याचे एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. त्याचे कोणतेही गाणे रिलीज होता क्षणीच सर्वत्र व्हायरल होत असते.

आताही राकेश मिश्राचे आणखी एक नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याने खूप कमी कालावधीत मिलियन व्ह्यूजचा अर्थात १० लाख हिट्सचा टप्पा गाठलेला दिसत आहे. राकेश मिश्राचे ‘ए राजा बहे चईत के लहरीया’ हे गाणे २० एप्रिलला प्रदर्शित झाले आहे. या गाण्याने पहिल्याच दिवशी लाखो व्ह्यूज मिळवले आहे.

राकेश मिश्राच्या या सुपरहिट गाण्यामध्ये अभिनेत्री माही मनीषा दिसत आहे. या गाण्यातील तिचा लूक आणि अंदाज पाहून चाहते तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे कौतुक करत आहे. या गाण्याला ‘अंगद मंजय’ यांनी लिहिले आहे तर ‘एडीआर आनंद’ यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. या गाण्याचे दिग्दर्शन ‘आनंद देव’ यांनी केले आहे, तर ‘नीरज सिंग’ हे या गाण्याचे निर्माते आहेत.

हे देखील वाचा