तुम्हाला फॅन्ड्री सिनेमा तर आठवत असेलच ना, २०१४ साली आलेला हा सिनेमा सुपरहिट झाला. नागराज मंजुळे यांच्या या चित्रपटातून राजेश्वरी खरात या नव्या चेहऱ्याने मराठी सिनेसृष्टीत यशस्वी पाऊल टाकले. पहिल्याच सिनेमातून राजेश्वरीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. पण तिचा हा सिनेमा आल्यानंतर ती गायब झाली. अनेक वर्ष राजेश्वरीने अभिनयातून ब्रेक घेतला होता. नंतर तीने आयटमगिरी सिनेमातही काम केले. मात्र मागच्या काही दिवसांपासून राजेश्वरी अचानक चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे सोशल मीडियावर ती पोस्ट करत असलेले तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ.
राजेश्वरीच्या या झकास फोटोंनी सर्वांचेच लक्ष तिच्याकडे वेधून घेतले आहे. सध्या सोशल मीडियावर राजेश्वरीचाच बोलबाला दिसत आहे. तिचे रोजच नवे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहे. ग्लॅमरस फोटो आणि धमाल व्हिडीओ शेअर करत राजेश्वरी चाहत्यांमध्ये पुन्हा लोकप्रिय होत आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहतेदेखील तुफान लाईकस् देत आहेत.
फॅन्ड्री चित्रपटातील सध्या आणि सोज्वळ चेह-याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात तिचे अनेक बोल्ड आणि ब्युटीफुल फोटो सोशल मीडियावर शेयर करत आहे. राजेश्वरीचे मागच्या काही वर्षांमध्ये झालेले हे मोठे ट्रान्फॉर्मशन फॅन्सला सुखद धक्का देणारे ठरत आहे. फॅन्सलाही ही ग्लॅमरस राजेश्वरी खूप आवडत असून, तिच्या फॉलोवर्समध्ये देखील यांमुळे वाढ होत आहे.
‘फँड्री’ नंतर राजेश्वरीने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. परंतु तो चित्रपटही फार कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. मूळची पुण्याची असलेली राजेश्वरी चित्रपट पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून पुढे आली. वयाच्या १४ व्या वर्षी राजेश्वरीने फॅन्ड्रीमध्ये शालू ही भूमिका साकारली. बहुतकरून डोळ्यांनी बोलणारी शालू या सिनेमात सगळ्यांनाच भावली होती.
राजेश्वरीचा फक्त वेस्टर्नच नाही तर पारंपरिक लूकही नेटकऱ्यांना घायाळ करत असते.