Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘हाय रे मेरी परम सुंदरी!’ राजेश्वरी खरातचे ठुमके पाहून चाहतेही झाले ‘कावरेबावरे’

सिनेसृष्टीत असे क्वचितच काही कलाकार असतात, जे पहिल्याच चित्रपटातून लोकप्रियततेचे शिखर गाठतात. यातलीच एक लोकप्रिय अभिनेत्री आणि तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणजे राजेश्वरी खरात होय. अलीकडेच तिने एक व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. या व्हिडिओमध्ये राजेश्वरी वधूच्या वेशात दिसली होती. पांढऱ्या गाऊनमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती.

नुकताच तिने शेअर केलेला एक व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतोय. हा व्हिडिओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. ज्यात तुम्ही पाहू शकता की, तिने निळ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे, तर त्यासोबत ओढणीही घेतली आहे. मेकअपबद्दल बोलायचे झाले, तर यातील तिचा मेकअपही अतिशय उत्तम आहे. कुरळे केस करून तिने अतिशय स्टायलिश लूक केला आहे. एकंदरीत या लूकमध्ये राजेश्वरी कमालीची सुंदर दिसत आहे. (rajeshwari kharat dancing on kriti sanon’s param sundari song)

या व्हिडिओमध्ये ती क्रिती सेननच्या ‘मिमी’ चित्रपटातील ‘परम सुंदरी’ या गाण्यावर ठुमके लावताना दिसत आहे. यातील राजेश्वरीचे हावभाव आणि मुव्ह्ज अगदी पाहण्यासारखे आहेत. परफेक्ट लूक आणि परफेक्ट डान्स स्टेप्ससह सादर केलेला हा व्हिडिओ चाहत्यांकडून चांगलाच पसंत केला जात आहे.

हा व्हिडिओ शेअर करत राजेश्वरीने कॅप्शनमध्ये लिहिलंय ‘परम सुंदरी’. तर सोबतच तिने डान्सिंग गर्लचा ईमोजीही पोस्ट केला आहे. या व्हिडिओवर नेहमीप्रमाणे चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. व्हिडिओवर आतापर्यंत अनेक कमेंट्स आणि हजारो लाईक्स आले आहेत.

राजेश्वरीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती आगामी काळात ‘रेडलाईट’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती एका वैश्येची भूमिका साकारत आहे. चाहते तिच्या या चित्रपटासाठी खूपच उत्सुक दिसत आहेत. शिवाय या अगोदर ती ‘फँड्री’ आणि ‘आयटमगिरी’ या चित्रपटात दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ

-‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर

-बोल्ड आणि डॅशिंग! ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा नवीन लूक आला समोर

हे देखील वाचा