Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘मंगलमूर्ती मोरया’, म्हणत ‘शालू’नं दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा; चाहत्यांनाही आवडला तिचा लूक

मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सातत्याने तिच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यातील घटनांची माहिती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना देत असते. सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या प्रत्येक पोस्टला ते भरभरून प्रतिसाद देत असतात. सर्वांच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे. अनेक कलाकारांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाला आहे. अशातच राजेश्वरीने देखील बाप्पासोबत फोटो शेअर करून सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राजेश्वरीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे बाप्पासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने चॉकलेटी रंगाची साडी नेसली आहे. तसेच तिने साडीला मॅचिंग बांगड्या घातल्या आहेत. तसेच सगळा साजशृंगार केला आहे. या फोटोमध्ये ती फार सुंदर दिसत आहे. ती बाप्पाला वंदन करताना दिसत आहे. तसेच दुसऱ्या फोटोमध्ये तिने बाप्पाची मूर्ती मांडीवर घेतलेली दिसत आहे. (Rajeshwari kharat share a photo with ganpati bappa on social media)

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “गणेश चतुर्थीच्या तुम्हाला व तुमच्या सर्व कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.” तिने शेअर केलेल्या या फोटोवर तिचे अनेक चाहते प्रतिक्रिया देत आहेत. तसेच तिच्या या लूकचे देखील कौतुक करत आहेत.

राजेश्वरीने नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ चित्रपटातून २०१३ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटातील तिचे शालू हे पात्र खूप गाजले होते. या चित्रपटात ती अत्यंत साध्या पेहरावात दिसली होती. त्यानंतर तिने २०१७ साली ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. नुकतेच तिच्या ‘रेडलाईट’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तसं पाहायला गेलं, तर राजेश्वरीने जास्त चित्रपटात काम केले नाही. मात्र, कमी कालावधीत तिने चांगले नाव कमावले आहे. सोशल मीडियावर तिचा लाखोंमध्ये चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिची कोणतीही पोस्ट व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘वर्षभर या एका सणाची मी आतुरतेने वाट पाहत असते’, म्हणत श्रेया बुगडेने दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!

-श्वास रोखून धरा! रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर; ‘या’ दिवशी होणार रिलीझ

-क्रिकेटमधील ‘दादा’ गाजवणार सिनेमाचं मैदान; झालीय सौरव गांगुलीच्या बायोपिकची घोषणा

हे देखील वाचा