Wednesday, July 3, 2024

राजेश्वरी खरातचा डान्स पाहून चाहत्याने थेट कमेंट बॉक्समध्ये केली ‘ही’ मागणी

‘फॅन्ड्री’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात तर तुम्हा सर्वांना आठवतच असेल. का नाही आठवणार शेवटी तुम्हाला देखील तिच्या प्रितिचा विंचू चावलाच असेल ना ? आता आलं ना ध्यानात! आपण बोलत आहोत आपल्या लाडक्या शालूबद्दल. अत्यंत साधीभोळी, दोन वेण्या घालून शाळेत जाणारी शालू म्हणजेच राजेश्वरी तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र खूपच बोल्ड आणि हॉट आहे. तिच्या चित्रपटापेक्षा सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टवरूनच खूपच चर्चेत असते. अशातच तिचा एक सुंदर व्हिडिओ समोर आला आहे.

राजेश्वरीने (rajeshwari kharat) अलीकडेच इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ती ‘ओये ओये’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि लाल रंगाचा स्कर्ट घातलेला दिसत आहे. या व्हिडीओवरील तिचे हावभाव पासून तिचे चाहते अवाक झाले आहेत. (rajeshwari kharat share her dance video on social media)

हा व्हिडिओ शेअर करून तिने “ओये ओये”, असे कॅप्शन दिले आहे. तिचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “मराठीची मलायका आहे तू.” तसेच हा व्हिडिओ पाहून एका चाहत्याने आणखी एका व्हिडिओची मागणी केली आहे. त्याने कमेंट केली आहे की, “मॅडम ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘सामी’ गाण्यावर करा ना, व्हिडिओ!” तसेच बाकी अनेक चाहते या पोस्टवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

राजेश्वरीने नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ चित्रपटातून २०१३ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने २०१७ साली ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. तसं पाहायला गेलं, तर राजेश्वरीने जास्त चित्रपटात काम केले नाही. मात्र, कमी कालावधीत तिने चांगले नाव कमावले आहे. सोशल मीडियावर तिचा लाखोंमध्ये चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिची कोणतीही पोस्ट व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. नुकतेच काही दिवसांपूर्वी तिचा ‘रेडलाईट’ हा लघुपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ती एका वेश्याच्या भूमिकेत दिसत आहे. एवढ्या कमी वयात तिने असे पात्र निभावण्याचे धाडस केले, याबद्दल तिचे खूप कौतुक झाले.

हेही वाचा :

 

हे देखील वाचा