सन २०१४ मध्ये एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्याने मोठ- मोठ्या कलाकारांचा समावेश असलेल्या चित्रपटांनाही दिवसा चांदण्या दाखवल्या होत्या. त्या चित्रपटात अनुभवी कलाकारांचा समावेश नव्हता, तर खेड्यातील मुलांना घेऊन तो चित्रपट बनवण्यात आला होता. चित्रपट बनवण्यासाठी तब्बल १.७५ कोटी रुपये खर्च आला होता. जेव्हा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी म्हणजेच १४ फेब्रुवारी, २०१४ रोजी तो चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा चित्रपटाने सगळे रेकॉर्ड मोडत तब्बल ७ कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट म्हणजेच नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ होय. याच चित्रपटातील कलाकारांना जबरदस्त प्रसिद्धी मिळाली. त्यातील अभिनेत्री म्हणजेच सर्वांची लाडकी ‘शालू’ अर्थातच राजेश्वरी खरात होय.
सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या आघाडीच्या मराठी अभिनेत्रींमध्ये राजेश्वरीचा समावेश होतो. राजेश्वरी नेहमीच आपल्या आयुष्यातील नवनवीन गोष्टी, अनुभव, फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आताही तिने एक फोटो शेअर केला आहे. आपल्याच फोटोवर कमेंट करत तिने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
राजेश्वरीने आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर एक फोट शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत तिने “शांततापूर्ण सकाळ,” असे लिहिले आहे. मात्र, कमेंटमध्ये तिने लिहिले की, “मित्र कमी आणि ट्रोलर्सच जास्त भरले आहेत आयुष्यात. हरकत नाही.” यासोबतच तिने हार्ट इमोजीचाही समावेश केला आहे. तिच्या या पोस्टवर चाहते प्रतिक्रिया देत प्रेम व्यक्त करत आहेत.

कलाकारांना नेहमीच या ना त्या कारणामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. कदाचित यामुळे अभिनेत्रीने अशी कमेंट केली असावी.
राजेश्वरीला काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. याची माहिती तिने २६ एप्रिल रोजी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत दिली होती. यावेळी चाहत्यांनी तिला काळजी घेण्यासाठी हजारो कमेंट केल्या होत्या. यावेळी तिच्यावर असणारं चाहत्यांचं प्रेम स्पष्टपणे दिसून आलं.
राजेश्वरीची दररोज आपल्याला एक तरी पोस्ट हमखास पाहायला मिळते म्हणजे मिळतेच. ती चाहत्यांशी संवाद साधण्याची एकही संधी सोडत नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘काळ्या चिमण्या दिसंना झाल्यात, आवरा राव थोडंसं’, शालूचा डान्स पाहून चाहत्याची भन्नाट कमेंट
-‘सनी लिओनीचे व्हिडिओ पाठवू का?’ म्हणणाऱ्या युजरला अभिनेत्री राजेश्वरी खरातचे खडेबोल, म्हणाली…










