Tuesday, April 8, 2025
Home मराठी ‘तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखे!’, शालूच्या फोटोने पुन्हा उडवली चाहत्यांची झोप

‘तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखे!’, शालूच्या फोटोने पुन्हा उडवली चाहत्यांची झोप

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ मधील ‘शालू’ म्हणजेच राजेश्वरी खरात आजकाल खूपच लाईमलाईटमध्ये राहते. ‘फँड्री’मध्ये जब्या आणि शालूची प्रेमकथा इतकी प्रचंड गाजली की, त्याने राजेश्वरीला अमाप लोकप्रियता मिळवून दिली. आज ती तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तरुणमंडळी शालूसाठी अक्षरशः वेडी आहे. तिचा फोटो पोस्ट होतो ना होतो, तोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडायला लागतो.

राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. पुन्हा एकदा तिने तिचा फोटो शेअर करून चाहत्यांना भुरळ पाडली आहे. या फोटोमध्ये तिने जांभळ्या रंगाचा टॉप घातला आहे. ओले असलेले केस तिने मोकळे सोडले आहेत, ज्याने तिच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे. या लूकमध्ये राजेश्वरीने मिरर सेल्फी क्लीक केला आहे.

https://www.facebook.com/100044631000266/posts/374387790725585/?sfnsn=wiwspwa

हा फोटो शेअर करत राजेश्वरीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखे!” फोटोप्रमाणे कॅप्शनवरही चाहते फिदा झाले आहे. कमेंट सेक्शनमध्ये नेहमीप्रमाणे तिच्या सौंदर्याचं भरभरून कौतुक केलं जात आहे. शिवाय या फोटोवर लाईक्सचाही मोठ्या प्रमाणात वर्षाव केला जात आहे.

राजेश्वरीने ‘फँड्री’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. या एकाच चित्रपटाने राजेश्वरी खूप लोकप्रिय झाली. त्यानंतर तिने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केलं. नुकतंच राजेश्वरीने तिच्या आगामी ‘रेड लाईट’ चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं. एक अनोखी कथा घेऊन राजेश्वरी लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वयाच्या चौथ्या वर्षी गायनाला सुरूवात करणाऱ्या सोनूने अभिनयातही आजमावलाय हात; वाचा त्याचा सुरेल प्रवास

-‘मनमोहिनी आज पाहिली…’, म्हणत कोणाच्यातरी विचारात गुंग झालाय स्वप्नील जोशी

-‘अश्रू आणि घाम दोन्हींमध्ये मीठ असतं, पण…’ अमिताभ बच्चन यांची लक्षवेधी पोस्ट इंटरनेटवर व्हायरल

हे देखील वाचा