Wednesday, July 3, 2024

राजेश्वरीने चाहत्यांना विचारलं, ‘चहा झाला का?’, चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रीया पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

सध्या सोशल मीडियावरील चाहत्यांचा विचार केला तर अभिनेत्री राजेश्वरी खरातचे चाहते हे सर्वात जास्त ॲक्टिव चाहते आहेत. राजेश्वरीने नुसता फोटो जरी शेअर केला तरी त्यावर कमीत कमी २-३ हजार कमेंट्स तर डोळे झाकून येतात. मराठीमध्ये सोशल मीडियावर असलेल्या अभिनेत्रींपैकी राजेश्वरी एक मोठी सेलिब्रेटी आहे, जीचा येथे तगडा फॅन फॉलोविंग आहे. राजेश्वरीही आपल्या या चाहत्यांसाठी रोज न चुकता एक तरी पोस्ट करत असतेच.

अनेक कलाकार सहसा त्यांच्या पोस्टवर कमेंट्स करत नाहीत किंवा चाहत्यांना रिप्लायही करत नाही. मात्र राजेश्वरी यावरही आघाडीवर आहे. ती सतत तिच्या पोस्टवर कमेंट्स करते तसेच चाहत्यांच्या प्रश्नांना कमेंट्समध्ये उत्तरही देते. कधी कधी अयोग्य चुकिच्या कमेंट्स करणाऱ्या फॅन्सला चांगलं खडसावतेही. सध्या अशीच एक कमेंट व्हायरल होत आहे, ज्या राजेश्वरीने चाहत्यांना प्रश्न विचारला आहे की, चहा झाला का? यावर चाहत्यांनही भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत.

शुक्रवारी राजेश्वरीने ब्लॅक रंगाच्या टॉपमधील तिचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोला जवळपास ६६ हजार लाईक्स व ३ हजार ५०० पेक्षा जास्त कमेंट्स आल्या. याच फोटोच्या कमेंट बॉक्समध्ये राजेश्वरीने ‘Good evening.. How you all are doing ?? चहा झाला का ??’ अशी एक कमेंट केली. या तिच्या कमेंटवर जवळपास ३४४ भन्नाट रिप्लाय आले आहेत.

वाचा- ‘जो त्रास मी सहन केलाय, तसा त्रास सहन करण्याची वेळ कुणावरही येऊ नये,’ का केली राजेश्वरी खरातने भावनिक पोस्ट?

यात एका चाहत्याने तिला ‘नाही ना रानात आलोय, काळी चिमणी शोधायला, पण मिळतचं नाही’ असा रिप्लाय केलाय, तर दुसऱ्या एका चाहत्याने ‘नाही एक कटिंग दे तुझ्या प्रेमाची मलाई मारुन’ अशी कमेंट केली आहे. विकास नावाच्या एका चाहत्याने तर ‘तू बनवला असेल तर बोलव आम्हाला, आम्ही नक्की येऊ चहा पिण्यासाठी’ अशी कमेंट केली आहे. एकाने तिच्या फोटोवर खारी-टोस्टचा फोटो शेअर करत चहासोबत खारीची ऑफर दिलीय. ‘मॅडम तुमचा नुसता फोटो पाहिला तरी चहा पिल्यासारखं वाटतंय,’ असाही एकाने रिप्लाय केला आहे.

वाचा- सनी लिओनीचे व्हिडिओ पाठवू का? म्हणणाऱ्या युजरला अभिनेत्री राजेश्वरी खरातचे खडेबोल, म्हणाली…

राजेश्वरीबद्दल थोडक्यात-
अभिनेत्री राजेश्वरी खरातने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फंड्री सिनेमातून चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवले होते. या चित्रपट मराठी सिनेप्रेमींमध्ये अतिशय लोकप्रिय ठरला. २०१४ साली आलेल्या या सिनेमाने राजेश्वरीसह अनेक कलाकारांना रातोरात स्टार केले होते. तेव्हापासून राजेश्वरीची लोकप्रियता तसुभरही कमी झालेली नाही. ८ एप्रिल रोजी आपला २३वा वाढदिवस साजरा केलेल्या राजेश्वरीने त्यानंतर थेट जुन २०१७मध्ये रिलीझ झालेल्या प्रदिप टोंगे दिग्दर्शित आयटमगिरी सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमाने जरी म्हणावे तसे यश मिळवले नसले, तरीही राजेश्वरीच्या भूमिकेचे कौतूक झाले होते. त्यानंतर राजेश्वरी अनेक वेळा मॉडेलिंग करताना दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

लईच भारी! वेगवेगळ्या सणानिमित्ताने चाहत्यांना पाहायला मिळाला  शालू चा निराळा अंदाज, तुम्हीही पाहा राजेश्वरी खरातचे खास फोटो

तुने जिंदगी में आके जिंदगी बदल दी, पाहा राजेश्वरी कोणासाठी गातीये हे गाणे

जब्याच्या शालुचा नखरा लय भारी!! अभिनेत्री राजेश्वरी खरातचा नवा व्हिडिओ पाहून चाहत्यांची दांडी गुल!

हे देखील वाचा