Wednesday, December 3, 2025
Home साऊथ सिनेमा हा क्षण अनमोल- रजनीकांत यांच्या इफ्फी सन्मानानंतर ऐश्वर्याची पोस्ट चर्चेत

हा क्षण अनमोल- रजनीकांत यांच्या इफ्फी सन्मानानंतर ऐश्वर्याची पोस्ट चर्चेत

भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक रजनीकांत यांना त्यांच्या गौरवशाली कारकिर्दीच्या ५० वर्षांच्या निमित्ताने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) येथे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या अभिनय प्रवासाचा अर्धा शतकाचा टप्पा गाठताना मिळालेल्या या सन्मानाने चाहत्यांसह संपूर्ण दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत आनंदाची लाट उसळली आहे.

या विशेष क्षणानंतर रजनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी ऐश्वर्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. इंस्टाग्रामवरील या पोस्टमध्ये तिने आपल्या वडिलांचा अभिमान व्यक्त करत अनेक फोटो टाकले. “हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांपैकी एक आहे. बाबा, तुमचा प्रवास आम्हा सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे, असे ऐश्वर्याने लिहिले. तिच्या या पोस्टवर काही मिनिटांतच हजारो लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला.

या वर्षी, इफ्फीने गुरु दत्त, राज खोसला, ऋत्विक घटक, पी. भानुमती, भूपेन हजारिका आणि सलील चौधरी यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींची शताब्दी देखील साजरी केली. त्यांच्या क्लासिक चित्रपटांच्या पुनर्संचयित आवृत्त्या प्रदर्शित करण्यात आल्या.

इफ्फीचा इंडियन पॅनोरमा विभागही विशेष आकर्षण ठरला. यात 25 फीचर फिल्म्स, 20 नॉन-फीचर फिल्म्स आणि 5 पदार्पण चित्रपटांना स्थान देण्यात आले होते. देशभरातील विविध भाषांतील कथा, नव्या पिढीचे फिल्ममेकर्स आणि भारतीय सिनेमाची विविधता या विभागात प्रभावीपणे मांडण्यात आली.रजनीकांत यांच्या सन्मानानंतरचा हा कार्यक्रम आणि ऐश्वर्याची भावनिक प्रतिक्रिया सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

7 डिसेंबरची तारीख ठरेल का शुभमुहूर्त? स्मृती मंधानाच्या भावाने दिले महत्त्वाचे संकेत

हे देखील वाचा