Wednesday, April 16, 2025
Home बॉलीवूड निर्मला सीतारामण यांनी २०२२ वर्षाच्या बजेटमध्ये केलेल्या ‘या’ घोषणेमुळे राजकुमार रावने मानले सरकारचे आभार

निर्मला सीतारामण यांनी २०२२ वर्षाच्या बजेटमध्ये केलेल्या ‘या’ घोषणेमुळे राजकुमार रावने मानले सरकारचे आभार

राजकुमार राव (Rajkumar Rao) हा बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेता आहे. त्याच्या अभिनयातून तो नेहमीच प्रेक्षकांना आश्चर्यचकित करताना दिसतो. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारा राजकुमार अनेकदा सामाजिक मुद्द्यांवर देखील त्याचे मत व्यक्त करताना दिसतो. सध्या राजकुमार त्याच्या आगामी ‘बधाई दो’ (Badhai Do) सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच देशाच्या वित्तमंत्री असलेल्या निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी चालू वर्षाचे बजेट सादर केले. या बजेटवर राजकुमाराने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

देशातील जनतेचे मानसिक आरोग्य लक्षात घेऊन सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. वित्तमंत्री असलेल्या निर्मला सीतारामण यांनी बजेट सादर करताना मेंटल हेल्थ काऊन्सलिंगसाठी नॅशनल टेली मेंटल हेल्थ प्रोग्राम (National Tele Mental Health) सुरु करण्याची घोषणा केली आहे. या प्रोग्राममुळे लोकांना लवकर बरे वाटण्यास मदत होणार आहे. तणावाखाली राहणाऱ्या अनेक लोकांना टेली कॉफ्रेंसिंग मार्फत काऊन्सलिंग करण्यात येईल. याला टेक्निकल मदत आयआयटी बंगलोरकडून मिळणार आहे. या घोषणेबद्दल राजकुमार रावने सरकारचे आभार मानले आहे. सोबतच या निर्णयाचे स्वागत देखील केले आहे.

Photo Courtesy Instagramrajkummar rao

कोरोनाच्या महामारीने देश आणि जगाला मोठ्या स्वरूपावर प्रभावित केले आहे. या आजारामुळे अनेक लोकांना मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक लोकं बेरोजगारीमुळे, अनेक लोकं आपल्या आप्तस्वकीयांना गमावल्यामुळे, अनेकांना काम मिळणे देखील बंद झाले तणावाखाली आले आहे. या कोरणामुळे बॉलिवूडवर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तणावाखाली आलेल्या लोकांना मोठ्या प्रमाणावर या प्रोग्रामचा फायदा होणार आहे.

सध्या राजकुमार त्याच्या आगामी ‘बधाई दो’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, त्याच्यासोबत या चित्रपटात भूमी पेडणेकर दिसणार आहे. या सिनेमातून एका मोठ्या आणि गंभीर समस्येला समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. हा सिनेमा येत्या ११ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा