Friday, September 20, 2024
Home बॉलीवूड स्त्री ने मारली बॉक्स ऑफिसवर बाजी ! भल्याभल्यांना टाकलं मागे…

स्त्री ने मारली बॉक्स ऑफिसवर बाजी ! भल्याभल्यांना टाकलं मागे…

२०१८ च्या हिट चित्रपट ‘स्त्री’चा सिक्वेल घेऊन श्रद्धा कपूर बॉक्स ऑफिसवर परतली आहे. अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री 2’ नुकताच १४ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित  झाला आणि बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. सुमारे दोन दिवसांत या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि चित्रपटाने ओपनिंग देखील धमाकेदार घेतली आहे. 

‘स्त्री 2’ ने दोन दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर ११८ कोटींची कमाई केली आहे. भारतात आणि १००.१ कोटी रुपयांची कमाई करून स्त्री-२ ने हा नवा विक्रम केला आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या ‘स्त्री -२’ला दोनच दिवसांत खूप यश मिळाले असून, येत्या दिवसांत देखील हा चित्रपट कमाईचे अनेक नवनवीन विक्रम प्रस्थापित करण्याची पुरेपूर शक्यता आहे.  

या चित्रपटाने दोनच दिवसांत १०० कोटींचा आकडा पार केला आहे. नुकतेच, निर्मात्यांनी एक पोस्टर रिलीज केले आणि प्रेक्षकांना चित्रपटाच्या दोन दिवसांचे एकूण कलेक्शन सांगितले. निर्मात्यांच्या मते, चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात ७६.५ कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ४१ कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता वीकेंड आला आहे आणि रक्षाबंधन सोमवारी आहे, त्यामुळे चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे भारतातील बॉक्स ऑफिसवर स्त्री 2 च्या यशात नक्कीच वाढ होईल. 

स्त्री -२ अतिशय चांगल्या तारखेवर प्रदर्शित झाला आहे. बुधवारी किंवा गुरुवारी चित्रपट प्रदर्शित करण्याची हि नवी पद्धत हिंदी चित्रपटांनी अवलंबलेली बघायला मिळते आहे. ज्यामुळे चित्रपटाला बक्कळ कमाई करण्यासाठी भरपूर दिवस आणि सुट्ट्या मिळतात.२ दिवसात १०० कोटींचा टप्पा ओलांडणारा हा पहिला महिलाकेंद्रित चित्रपट आहे. एनिमल, पठाण आणि जवान यांच्यानंतर स्त्री २ ने १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करून हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

या दिवशी प्रदर्शित होणार ‘भूल भुलैया 3’चा टीझर; कार्तिक आर्यनच्या भुताची झलक समोर

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा