अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा मागील काही दिवसांपासून त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. सातत्याने अशा बातम्या येत आहेत की, ते दोघे लवकरच लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाबाबत ही बातमी ऐकून त्यांचे चाहते खूप खुश झाले आहेत. त्यांचे चाहते त्यांच्या लग्नासाठी खूप उत्साहित आहेत. राजकुमार आणि पत्रलेखा यांची जोडी सगळ्यांना खूप आवडते. माध्यमातील वृत्तानुसार त्यांचे लग्न चंडीगडमध्ये होणार आहे.
आता त्यांच्या लग्नाबाबत ही माहिती समोर आली आहे की, लग्नाच्या दिवशी राजकुमार त्याच्या पत्नीला एक खास गिफ्ट देणार आहे. तो त्याच्या या खास गिफ्टची तयार देखील करत आहे. त्यांच्या नात्यातील एक खास गोष्ट म्हणजे जेव्हापासून ते रिलेशन आले आहेत तेव्हापासून राजकुमार तिच्यासाठी पत्र लिहितो. परंतु त्याने लिहिलेले काही पत्र आजही दिले नाहीयेत. ते त्याच्याजवळच आहे. (Rajkumar rao to give this romantic gift to patralekhaa on wedding day)
त्याने लिहिलेले ते पत्र तो पत्रलेखाला त्यांच्या लग्नाच्या दिवशी देणार आहे. त्यांचा प्रेम व्यक्त करण्याचा हा अंदाज खूप निराळा आहे. प्रत्येक मुलीला आयुष्यात जसा जोडीदार हवा असतो अगदी तसाच राजकुमार पत्रलेखासाठी आहे. तो पत्रलेखावर किती प्रेम करतो हे तो आता त्याच्या पत्राद्वारे तिला सांगणार आहे.
राजकुमारने ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये सांगितले होते की, जेव्हा पत्रलेखाने त्याला पहिल्यांदा पाहिले होते, तेव्हा तिला तो अगदीच नीच व्यक्ती वाटला होता. राजकुमारने सांगितले की, “पत्रलेखाने मला पाहिले तेव्हा तिला माझे ‘लव्ह सेक्स और धोका’ या चित्रपटातील पात्र आठवले. त्यामुळे ती माझ्यासोबत बोलत नव्हती. परंतु जेव्हा आम्ही बोलायला लागलो तेव्हा आमचा बॉन्ड खूप चांगला झाला.”
त्यांनी त्यांच्या लग्नाची तारीख अजूनही जाहीर केली नाही. त्यांचे लग्न कुठे होणार, लग्नाला कोण कोण हजर असणार तसेच बाकी सगळे प्लॅन जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्साहित आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-